Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अंजली दमानियांचं पावणे दोन लाखाचं घड्याळ हरवलं आणि बघा कुणाला सापडलं ?

Spread the love

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे पावणेदोन लाख रुपये किमतीचे घड्याळ हस्तगत करणे पोलसांसमोर आणि हॉटेल व्यवस्थापनासमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं पण शेवटी हे  घड्याळ सापडलं आणि सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला . काळ दुपारची बातमी अशी होती कि , अंजली दमानिया यांच्या महागड्या घड्याळाचा हा किस्सा सोमवारी रात्री ते मंगळवारी सकाळ दरम्यान निराला बाजार येथील पर्ल हॉटेलमध्ये घडला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात होता. तक्रारींनंतर सगळ्यांची झाडा झडती सुरु झाली पण माहिती मिळाली कि , दुसऱ्या दिवशी घड्याळ हॉटेलमधील ‘लॅन्ड्री’मध्ये सापडले आणि सांगण्यात आले कि , बेडशीटमध्ये घड्याळ अडकली होती त्यामुळे पोलिसही शांत झाले . विशेष म्हणजे हे घड्याळ महागडे तर होतेच पण अंजली दमानिया यांचे होते म्हणून ते सापडणे गरजेचे होते.

घटना अशी होती कि , सोमवारी अंजली दमानिया (वय ४० रा. ५०२, विजयश्री दुर्ग, सांताक्रुझ) त्यांच्या कामानिमीत्त शहरात आल्या होत्या. निराला बाजार येथील हॉटेल पर्लमध्ये खोली क्रमांक १०४मध्ये त्या मुक्कामाला थांबल्या होत्या. सोमवारी रात्री नऊ वाजता त्यांनी हॉटेलमध्ये ‘चेक-इन’ केले. सकाळी स्वच्छतागृहात जाताना त्यांनी त्यांचे लॉगीन्स वॉच या विदेशी कंपनीचे एक लाख ७३ हजार रुपये किंमतीचे घड्याळ त्यांनी रॅकमध्ये ठेवले होते. यानंतर दमानिया यांनी मंगळवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास हॉटेलमधून ‘चेक-आउट’ केले. दुपारी चारच्या सुमारास दमानिया यांना हातामध्ये घड्याळ नसल्याची आठवण आली. त्यानी पुन्हा हॉटेलमध्ये येऊन घड्याळाबाबत व्यवस्थापनाकडे विचारणा केली. यावेळी त्यांना घड्याळ नसल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी त्यांनी क्रांतीचौक पोलिस ठाणे गाठून अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. बुधवारी या खोलीची पुन्हा सायंकाळी झाडाझडती घेण्यात आली.

दमानिया यांनी हॉटेलची खोली सोडल्यानंतर तेथील चादरी, बेडशीट धुण्यासाठी लॅन्ड्रीमध्ये नेण्यात आली. दमानिया यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर हॉटेलमध्ये वेगाने चौकशी सुरू झाली. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनानेही शोधाशोध सुरू केली. त्यावेळी लॅन्ड्रीमधील एका बेडशीडला घड्याळ अडकल्याचे आढळले. हॉटेल व्यवस्थापनाने घड्याळ सापडल्याचे पोलिसांना कळविले आणि ते पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

दरम्यान क्रांतीचौक पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथक या प्रकरणी तपास करीत होते. दमानिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक राहूल सूर्यतळ यांनी पथकासह हॉटेलला भेट दिली. यावेळी हॉटेलमधील सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले . यामध्ये दमानिया यांच्या रुममध्ये सफाई कामगार तसेच वेटर जात असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेत चौकशी केली  तसेच मंगळवारी तीन संशयितांच्या घराची झडती देखील घेण्यात आली मात्र या झडतीमध्ये काही मिळाले नाही. अखेर हे घड्याळ सापडले .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!