Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : अंजली दमानिया यांच्या पावणेदोन लाखाच्या घड्याळाची चोरी , औरंगाबादच्या “या” हॉटेलात थांबल्या होत्या दमानिया…

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे  तब्बल १ लाख ७३ हजार रुपये किंमतीची मनगटी घड्याळ चोरट्याने लंपास केल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दिली आहे . दिनांक ४ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेच्या सुमारास निराला बाजार येथील पर्ल हॉटेल मध्ये ही चोरी झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. क्रांतीचौक  पोलीस ठाण्यात अंजली दमानिया (४०, रा. विजयश्री दुर्गा ६ रोड, सांताक्रुज मुंबई) यांनी तक्रार नोंदविली आहे.
या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे कि , दिनांक ४ जून रोजी त्या  काही कामानिमत्त औरंगाबाद निराला बाजार येथील पर्ल हॉटेल येथे थांबल्या होत्या. त्यांनी त्यांची १ लाख ७३ हजार रुपयांचे मनगटी घड्याळ रॅक मध्ये ठेवले. काही वेळे नंतर त्या बाथरुमला गेल्या. ही संधी साधत चोरट्याने त्यांचे घड्याळ चोरले. दमानिया या बाथरुमहून रुममध्ये आल्या असता त्यांना रॅक मध्ये ठेवलेले घड्याळ दिसले नाही. त्यांनी रुममध्ये घड्याळ शोधले मात्र त्यांना ते सापडले नाही.  दमानिया यांच्या तक्रारीनंतर  क्रांतीचौक पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पूढील तपास पोलीस  उपनिरीक्षक बागूल करित आहेत

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!