Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लक्ष्य विधानसभेचे : १८ खासदारांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे रामलल्लाच्या वाटेवर ….

Spread the love

विधानसभेचे वेध शिवसेनेला लागले असून लोकसभा निवडणुकीपूर्वी अयोध्येला जाऊन प्रभू रामाचं दर्शन घेणारे उद्धव ठाकरे येत्या १५ जून रोजी पुन्हा अयोध्येला जाणार आहेत. शिवसेनेच्या सर्वच्या सर्व खासदारांना घेऊन ते अयोध्येला जाणार असल्याने शिवसेना पुन्हा एकदा राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण तापवणार असल्याचं शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं आहे. उद्धव ठाकरे नोव्हेंबरमध्ये अयोध्येला गेले होते. त्यावेळी त्यांनी राम मंदिर उभारण्याची मागणी केली होती.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता पुन्हा त्यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली आहे. येत्या १५ जून रोजी सर्व खासदारांसोबत ते अयोध्येला जाणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जागांचे फिफ्टी-फिफ्टी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मित्रपक्षांना केवळ १८ जागा सोडण्याचा निर्णय घेऊन भाजपने आपल्या वाट्याला कमी जागा येणार नाहीत, याची काळजी घेतली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपला मुख्यमंत्रीपदासाठी कमी जागा पडल्यास मित्रपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार असून मित्रपक्षांचा कौल भाजपच्या बाजूनेच राहणार असल्याने शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर धर्मसंकट उभं राहिल्यानेच उद्धव यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा पुढे करून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं सांगण्यात येतं. त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांचा हा अयोध्या दौरा असल्याचंही राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!