Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

EVM : लोकशाहीच्या रक्षणासाठी ईव्हीएमच्या विरोधात ममता बॅनर्जी यांची आंदोलनाची तयारी

Spread the love

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन छेडलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी वापरण्यात आलेल्या ईव्हीएमवर बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मतदान बॅलेट पेपरच्या माध्यमातूनच घेतलं जावं याची मागणी लावून धरण्याचं आवाहन ममता यांनी इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही केलं आहे.  ईव्हीएमशी संबंधित उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची पडताळणी करण्यासाठी ‘फॅक्ट-फाइंडिंग’ समितीची स्थापन करण्याची गरज असल्याचंही ममता म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ममता बॅनर्जी यांनी पक्षाचे आमदार आणि राज्यातील मंत्र्यांची आढावा बैठक बोलावली होती.

‘आम्हाला लोकशाही जिवंत ठेवायची आहे. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा वापर केला जाणं आवश्यक आहे. यासाठी आम्ही आंदोलन करणार असून त्याची सुरुवात पश्चिम बंगालमधून होईल’, असं ममता पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत म्हणाल्या. विरोधी पक्षातील २३ पक्षाच्या नेत्यांसोबत बॅलेट पेपरच्या मागणीसंदर्भात बोलणं झालं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

माध्यमांचा गैरवापर आणि पैशांच्या ताकदीवर भाजपने निवडणूक जिंकल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. याशिवाय, भाजपने २३ जागांचा दावा केला होता, पण त्यांना १८ जागा मिळाल्या. मतदानाची टक्केवारी पाहता यंदा तृणमूलला मिळालेल्या मतांचं प्रमाण ४ टक्क्यांनी वाढलं आहे. डाव्यांमुळेच भाजपचे उमेदवार जिंकले, असा दावाही ममता यांनी केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!