Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तीन महिन्यांच्या बाळाला रेल्वेत टाकून माता झाली पसार

Spread the love

मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसहून निघणाऱ्या काशी एक्सप्रेस मध्ये एका महिलेने आपल्या अडीच ते तीन महिन्याच्या बाळाला बेवारस सोडून दिले. बेवारस स्थितीत हे बाळ आढळल्याने भुसावळ रेल्वे पोलिसांनी या बाळाला ताब्यात घेतले आहे. प्रवाशांनी भुसावळ  रेल्वे स्थानकावर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी संपूर्ण गाडीत या बाळाच्या आईचा शोध घेतला. मात्र कुठेही त्या महिलेचा शोध न लागल्याने अखेर रेल्वे पोलिसांनी या बाळाला आपल्या स्वाधीन घेऊन जळगाव येथील बालसुधारगृहात त्याची रवानगी केली.

अज्ञात महिलेने या बाळाला सोडून दिले असावे, गरिबीमुळे किंवा इतर कुठल्या कारणांमुळे त्या महिलेने त्या बाळाला सोडले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.  मात्र नेमकं कारण काय असावं हे चौकशी नंतरच कळेल असंही पोलिसांनी सांगितंलं.  रेल्वे स्टेशन आणि रेल्वे गाड्यांमध्ये अशा घटना वारंवार घडत असतात. अनैतिक संबंधातून किंवा इतर कारणांमुळे मुल झाल्यास त्याच्या पोलन पोषणाची जबाबदारी त्यांना घ्यायची नसते त्यामुळे असे पालक मुलाला रेल्वे स्टेशन परिसरात सोडून देतात. रेल्वे पोलीस अशा मुलांच्या पालकांचा शोध घेत असते. मात्र शोध न लागल्यास अशा मुला-मुलींना अनाथाश्रमात ठेवलं जातं. नंतर आश्रम अशा मुलांना दत्तक देण्याची व्यवस्था करता त्याचेही अतिशय कडक नियम असतात. त्याचं पालन केल्यानंतरच मुलांना दत्तक दिलं जातं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!