Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

एका मोबाईलमुळे झाली हत्या , आत्महत्या आणि चकमक , काय झाले ते पहा ….

A controversial program which can turn your iphone into a fake gun ....

Spread the love

एका मोबाईलमुळे काय होऊ शकते याची कल्पनाही कोणी करू शकत नाही . अशीच घटना मेरठ मध्ये घडली आहे त्याचे असे झाले कि , मेरठमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपला फोन दुसऱ्या एका व्यक्तीला विकला परंतु त्याने त्या फोनमधील डेटा क्लियर केला नाही . त्यामुळे झाले असे कि , ज्या व्यक्तीला त्याने फोन विकला त्या व्यक्तीने फोटो गॅलरीमधील फोन विक्रेत्याच्या माजी प्रेयसीसोबतचे फोटो बघितले आणि ते व्हायरल करण्याचा मोह आवरला नाही .  त्यानंतर मेरठ मध्ये धक्कादायक घटनांची मालिकाच सुरु झाली. मोबाइलमधील फोटो व्हायरल केल्यामुळे आत्महत्या, हत्या आणि चकमकीसारख्या भयानक घटना घडल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोबाइलमधल्या त्या फोटोंमुळे शनिवारी मुझफ्फरनगरमध्ये एका ३५ वर्षीय विवाहित महिलेने पाच वर्षाच्या मुलासोबत पूलावरुन नदीत उडी मारली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला पण पाच वर्षाच्या मुलाला वाचवण्यात यश आले. या फोटोंमुळे मेरठमध्ये रहाणाऱ्या या महिलेच्या सुखी वैवाहिक आयुष्यात वादळ आले. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे पूर्व प्रियकरासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. महिलेचा पूर्वप्रियकर शुभम कुमारने याने तिचे आणि त्याचे फोटो डिलीट केल्याशिवाय त्याचा फोन मेरठमध्ये रहाणाऱ्या अनुज प्रजापतीला विकला होता .

शुभम कुमारने हा फोन विकताना त्यातील फोटो डिलीट केले नव्हते. त्यामुळे हे फोटो  अनुजने व्हायरल केले. आत्महत्या करण्यापूर्वी  या महिलेने एका टपरीवाल्याच्या मोबाइलवरुन फोन केला होता. तपासामध्ये हा फोन नंबर मेरठमध्ये रहाणाऱ्या तिच्या नवऱ्याचा असल्याचे समोर आले. त्यावरुन तिची ओळख पटली.

अनुज प्रजापतीने व्हायरल केलेल्या फोटोमध्ये जी महिला होती त्याच महिलेने आत्महत्या केली असे मेरठचे एसपी अखिलेश नारायण सिंह यांनी सांगितले. त्यानंतर अनुज  प्रजापतीचा सुद्धा मृत्यू झाला. फोटो व्हायरल केल्याच्या रागातून शुभम आणि त्याच्या मित्रानी २३ मे रोजी मेरठच्या कानकेरखेरा भागात अनुजची हत्या केली. महिलेला जेव्हा हे फोटो व्हायरल झाल्याचे समजले तेव्हा तिने शुभमला फोन करुन आपला राग व्यक्त केला होता. त्यानंतर शुभमने अनुजची हत्या केली.

सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल फोनवरुन मेरठ पोलिसांनी अनुज प्रजापतीच्या मारेकऱ्यांचा शोध सुरु केला. मेरठ पोलिसांआधी सहारनपूर पोलिसांनी चकमकीनंतर संशयितांना बेडया ठोकल्या. दोन बाईकवरुन पळणाऱ्या पाचजणांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!