Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत अशोक चव्हाण यांनी दिला राजीनामा

Advertisements
Advertisements
Spread the love

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले असून खुद्द काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील आपल्या राजीनाम्याचा प्रस्ताव दिला होता. त्यातच आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपला राजीनामा दिला आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज बब्बर यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तर राहुल गांधी यांच्या अमेठीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत जिल्हाध्यक्ष योगेश मिश्रा यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

Advertisements

मी आपल्या महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठवला आहे. आता पक्षांतर्गत फेरबदलाचा निर्णय राहुल गांधी यांना घ्यायचा असल्याचे अशोक चव्हाण यांनी नमूद केले. तसेच यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार त्यांनाच आहेत. तसेच लवकरात लवकर मी राहुल गांधी यांची यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!