Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नांदेडमध्ये उष्णतेची सर्वाधिक लाट , ४५ अंश सेल्सियस तापमानामुळे नांदेडकर घामाघूम

Spread the love

मराठवाडा उन्हाने चांगलाच होरपळत असून दिवसा ते दिवसा आणि रात्रीही उकाडा काही केल्या कमी होत नसल्याने लोक घामाघूम होत आहेत . दरम्यान नांदेड मध्येच मात्र  या वर्षातील उच्चांकी म्हणजे ४५ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर संचारबंदी सदृश परिस्थिती पाहावयास मिळत आहे . मराठवाडा , विदर्भाच्या तापमानात  मोठी वाढ झाली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच ४० अंशापेक्षा अधिक असणारे तापमान दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

शनिवार आणि रविवारी तर तापमानाने उच्चांक गाठल्यामुळे  अंगाची लाही लाही होत आहे . गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या तापमानामुळे प्रमुख बाजारपेठातील गर्दीही  लक्षणीय घटली आहे. शिवाय रस्त्यांवरही दिवसभर शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. अनेक भागात महावितरणकडून विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने नागरिकांना प्रचंड उकाडयाचा त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे आगीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे.
वाढत्या तापमानामुळे सर्दी, खोकला, ताप, व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण वाढले आहेत. विशेषत: तापमानातील बदलाचा लहान मुलांना मोठा फटका बसत आहे. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!