Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Uttar Pradesh : मागास वस्तीत मतांसाठी पैसे देणाऱ्या भाजप समर्थकाला दिले पोलिसांच्या ताब्यात

Spread the love

उत्तर प्रदेशातील मागास घटकातील उमेद्वारांनीं  भाजपा समर्थकाला “तुमचे पैसे परत घ्या, आम्ही मत विकत नाही” असं स्पष्टपणे बजावत पिटाळून लावल्याची घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील चंदोली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या जीवनपूर गावातील ही घटना आहे. गावातील माजी प्रमुख आणि भाजपा समर्थक छोटेलाल तिवारी याने काही गुंडाच्या मदतीने मागास  वस्तीतील ६ जणांना धमकी दिल्याचं उघड झालं. ५०० रुपये घ्या आणि मतदान आम्हाला मतदान करा किंवा मग कुणालाही करु नका असं आमिष दिल्यानंतर ६४ वर्षीय पनारू राम यांनी भाजपा समर्थकाला आम्ही मत विकत नाही, तुमचे पैसे परत घ्या असं बजावलं. यावरुन छोटेलाल तिवारी यांनी जबरदस्तीने पनारू राम यांच्या उजव्या हाताच्या बोटाला शाई लावण्याचा प्रकार केला होता.  या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी छोटेलालला पोलिसांनी अटक केली असून त्याचे साथीदार फरार झाले आहेत .

या बाबतची अधिक माहिती अशी कि , निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे १९ मे रोजी उत्तर प्रदेशातील चंदोली लोकसभेसाठी मतदान होते . मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी छोटेलाल तिवारी यांनी गावातील मागास  कुटुंबीयांना धमकावले. पनारु राम यांच्यासोबत ६ जणांनी भाजपा समर्थकाने दिलेली ऑफर फेटाळून लावली. हा सगळा प्रकार स्थानिक समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यासमोर उघड झाला. त्यानंतर या लोकांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करत पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली. रविवारी जेव्हा हे सगळे मतदानाला गेले तेव्हा त्यांच्या उजव्या हाताच्या बोटावर आधीच शाई लागली होती. पनारु राम सांगतात उजव्या हाताच्या बोटावरील शाई खोटी असून डाव्या हाताच्या बोटावरील शाई खरी आहे.

पोलिसांनी या प्रकरणी १८ मे रोजी छोटेलाल तिवारी आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. छोटेलाल तिवारीला अटक केली आहे मात्र त्याचे साथीदार फरार आहेत, फरार आरोपी कटवारू तिवारी आणि डिंपल यांचा शोध घेत आहोत अशी माहिती चंदोलीचे पोलीस अधिक्षक संतोष कुमार सिंह यांनी दिली. मात्र ही बाब समोर आल्यानंतर स्थानिक भाजपा नेत्यांनी या घटनेशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचं सांगत हात वर केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!