Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोदींच्या जागी नितीन गडकरी हे पंतप्रधानपदासाठी चांगला पर्याय ठरू शकतात : सुब्रमण्यम स्वामी

Spread the love

मोदींच्या जागी नितीन गडकरी हे पंतप्रधानपदासाठी चांगला पर्याय ठरू शकतात. असे झाल्यास मला फारच आनंद होईल. कारण गडकरीही मोदींसारखीच चांगली व्यक्ती आहे असे प्रतिपादन सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे.   गडकरी हे पंतप्रधानपदासाठी पात्र आहेत. मायावती एनडीएत येतील का, या प्रश्नालाही स्वामींनी उत्तर दिलं. मायावतींनी अजून त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही. उत्तर प्रदेशमध्ये बसपा हा पक्ष भाजपाच्या विरोधात लढतोय. अशातच मायावती कशा सोबत येतील. मायावतींनी ठरवल्यास बसपा एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतो. माझा यावर काहीच आक्षेप नाही.

ते म्हणाले, भाजपाला स्वबळावर बहुमत गाठता न आल्यास मोदी पंतप्रधान होणार नाहीत, त्यांच्याऐवजी नितीन गडकरी हे चांगला पर्याय ठरू शकतात. परंतु हे सर्व लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून असेल, हे सांगण्यासही स्वामी विसरले नाहीत. ‘हफपोस्ट इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत स्वामींनी अनेक मुद्द्यांवर परखड मत व्यक्त केलं आहे.

भाजपाला 230 किंवा त्याहून कमी जागा मिळाल्यास नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. समजा भाजपानं 220 किंवा 230 जागा जिंकल्या, आणि एनडीएच्या मित्र पक्षांना 30 जागा मिळाल्या, तर तो आकडा 250पर्यंत जाईल. पण तरीही बहुमतासाठी 30 जागांची गरज लागणार आहे. अशा परिस्थितीत मोदी पंतप्रधान राहणार की नाही, हे एनडीएतील इतर मित्र पक्ष ठरवणार आहेत. आम्हाला 30 किंवा 40 जागांचा पाठिंबा देणाऱ्या पक्षानं जर मोदींना पंतप्रधान करण्यास विरोध केला, तर आम्ही त्यांना पंतप्रधान करणार नाही, असंही स्वामी म्हणाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!