Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शिवाजी महाराजांचा अवमान : एमआयएमने माफी मागावी अन्यथा घुसून मारू : हर्षवर्धन जाधव यांचा व्हिडीओ व्हायरल

Spread the love

औरंगाबाद लोकसभा लढविलेले उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडीओ जारी करून त्यात म्हटले आहे कि, आपण सायंकाळी औरंगाबादला येत असून सर्व शिवभक्तांनी विमानतळावर एकत्र यावे. पोलीस आयुक्तांनी आपल्याला जी “त्या” मुलाची  क्लिप पाठवली आहे त्यात शिवरायांचा अवमान केलेल्या “त्या ” मुलाने  आपण हे कृत्य एमआयएमच्या सांगण्यानुसार केल्याचे म्हटले असून या बद्दल एमआयएमने तत्काळ जाहीर माफी मागावी किंवा आपला त्या तरुणाशी संबंध नसल्याचे जाहीर करावे अन्यथा आपण आपल्या कार्यकर्त्यांसह शहरातील एमआयएमची कार्यालये तोडून टाकू असा इशारा दिला आहे.

दरम्यान या संदर्भात महानायक ऑनलाईनशी  बोलताना उपायुक्त डॉ. राहुल खाडे म्हणाले कि, शिवरायांच्या संदर्भात अवमान करणारा मुलगा अल्पवयीन आहे. सायबर क्राईमचे लोक त्याबाबत अधिक तपास करीत आहेत.हर्षवर्धनजाधवयांच्या व्हिडीओ संदर्भात बोलताना ते म्हणाले कि, त्यांचा व्हिडीओ पोलिसांना मिळाला असून त्याबाबत योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास पोलीस समर्थ आहेत. पोलिसांची कारवाई चालू आहे.

शिवाजी महाराजांचा अवमान  केल्या प्रकरणी एमआयएमने माफी मागावी अन्यथा घुसून मारू असा इशारा दिलेला हर्षवर्धन जाधव यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. शहरातील एका अल्पवयीन मुलाची शिवाजी महाराजांचा अवमान करणारी क्लिप व्हायरल झाली होती. पोलिसांनी या प्रकाराची तात्काळ गंभीर दखल घेत संबंधित मुलावर  कारवाई सुद्धा केली होती. आणि सायबर क्राईम त्याबाबत अधिक तपास करीत आहे . परंतु आज हर्षवर्धन जाधव यांनी आपला व्हिडीओ जारी केला आहे.

आपल्या या व्हिडीओ मध्ये हर्षवर्धन जाधव यांनी तथाकथित हिंदुत्ववादी पक्षांना “छक्के” सुद्धा म्हटले असून या प्रकरणात एम आय एम ने माफी मागितली नाही तर पहिला हातोडा त्यांच्या  कार्यालयावर आपण चालवू आणि कट्टरपंथीयांना धडा शिकवू असे म्हटले आहे. या प्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यांचे कार्यकर्ते किरण खंदारे यांनी हा व्हिडीओ त्यांचाच असून आज त्यांनी जारी केला असल्याचे सांगितले. ते आऊट ऑफ स्टेशन असून सायंकाळ पर्यंत शहरात येतील असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!