Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शिवाजी महाराजांचा अवमान : आम्ही समर्थन कसे करणार ? हा तर शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न : आ. इम्तियाज जलील

Spread the love

https://www.facebook.com/imtiaz.jaleel/videos/678208772599471/

आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या चिथावणीखोर व्हिडिओवर आमदार इम्तियाज जलील यांनी आपली प्रतिक्रिया देणारा व्हिडीओ जारी केला आहे . या व्हिडीओ मध्ये त्यांनी म्हटले आहे , काही दिवसांपूर्वी १३, १४, वर्षाच्या एका मुलाचा व्हिडीओ बनवून शहरात व्हायरल केला होता. या व्हिडीओमध्ये आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली होती . वास्तविक या मुलाचा आणि एमआयएमचा काहीही संबंध नाही. आम्ही याचे खंडन करतो .

याबाबत आम्ही स्वतः पोलीस आयुक्ताना भेटून सांगितले कि, यावर कायदेशीर कारवाई करावी. हे शहर आमचे आहे. मी शहरातील शांतीप्रिय जनतेला आवाहन करतो कि , अशा प्रकाराला बळी पडू नये . त्याला हा व्हिडीओ बनविण्यास ज्याने प्रवृत्त केले त्याचा शोध पोलिसांनी घ्यावा.  त्याच्याशी आमचे काहीही घेणे देणे नाही . आम्ही त्याचे समर्थन करीत नाही.परंतु एका  राजकीय व्यक्तीकडून  या प्रकरणाचे  भांडवल करून शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी हातावर हात मारून न बसता संबंधितांवर कारवाई करावी.

आ . जलील यांनी म्हटले आहे कि, वस्तुस्थिती अशी असतानाही एक राजकीय नेता अशा प्रकारचा धमकी देणारा व्हिडीओ व्हायरल करतो, हे काय जंगल राज आहे का ?कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, आम्ही आधीच सांगितले आहे कि, या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करावी. आणि मी पुन्हा त्या नेत्याला सांगू इच्छितो कि, शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जितके तुमचे आहेत तितके आमचेही आहेत . त्यांच्यावर कोणाचाही कॉपीराईट नाही.

दरम्यान या प्रकरणात पोलीस अधिक तपास करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या प्रत्नात असल्याचे पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांनी  सांगितले आहे.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!