Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकसभा निवडणूक २०१९ लाइव्ह…. लोकसभा निवडणूक : दुपारी एक वाजेपर्यंत देशभरात ३७.८९ टक्के मतदान

Spread the love

सतराव्या लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाला देशभर सुरुवात झाली असून राज्यातील १४ तर देशभरातील ११५  जागांवर मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली आहे. आज राज्यातील  औरंगाबाद , जालना , पुणे, बारामती, सातारा, अहमदनगर या महत्त्वाच्या जागांवरील उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

औरंगाबादमधील झाकीर हुसेन शाळा येथील मतदान केंद्रावर बोगस मतदान केल्यामुळे एकाला ताब्यात घेतले आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी ४२.२० टक्के मतदान
औरंगाबाद: गंगापुर तालुक्यात शरीफपुरवाडी येथील ग्रामस्थांनी गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्याकारणाने मतदानावर बहिष्कार
अरुण जेटलींनी बजावला मतदानाचा हक्क
ईव्हीएममधून फक्त भाजपालाच मत: अखिलेश यादव

ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केला आहे. ईव्हीएममधून फक्त भाजपालाच मत जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. रामपूरमध्ये बऱ्याच ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी आहेत. मतदान यंत्रात बिघाडाशिवाय प्रक्रिया पार पडायला हवी: अखिलेश यादव

नवी दिल्ली: बॉक्सर विजेंदर सिंग काँग्रेसच्या तिकीटावर दक्षिण दिल्ली मतदारसंघातून लढवणार लोकसभा निवडणूक

मुंबई: जामीन रद्द करून निवडणूक लढण्याची परवानगी न देण्याची याचिकेतील मागणी कुठल्याही कायद्याला अनुसरून नाही, साध्वी प्रज्ञाचा ठाकूरचा विशेष एनआयए कोर्टात दावा

नवी दिल्ली: अभिनेता सनी देओल थोड्याच वेळात करणार भाजपत प्रवेश

पुण्यातील श्रद्धा गजानन भगत या तरुणीने स्वत:च्या लग्न मंडपात जाण्याआधी मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. नववधू म्हणून नटलेल्या श्रद्धाने अप्पा बळवंत चौकातील नु.म.वि शाळेतील मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला.

सोलापुरातील करमाळा तालुक्यातील रिद्देवाडी गावातील लोकांचा मतदानावर बहिष्कार, आतापर्यंत एकही मतदान झालं नाही, गावात रस्ता नसल्याने नागरिकांचा निर्णय
हार्दिक पटेल यांनी बजावला मतदानाचा हक्क

वाढत्या उन्हामुळे मतदारांचे हाल. मतदार शोधताहेत आडोसा.

उदयनराजे भोसले यांनी बजावला मतदानाचाहक्क

यंदा एका पक्षाची नव्हे तर NDA ची सत्ता: संजय राऊत

लोकसभा निवडणूक: सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी – कोल्हापूर: ६.७१ टक्के, पुणे: ८.७१ टक्के, माढा: ७.२५ टक्के, बारामती: ६.१ टक्के, सांगली: ७ टक्के, अहमदनगर: ४ टक्के, औरंगाबाद: ९ टक्के

अहमदनगर: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे बजावला मतदानाचा अधिकार

पुणे: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्नी भाग्यश्री यांच्यासह बावडा या गावी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मुलगा राजवर्धन व मुलगी अंकिता यांनी देखील मतदान केले.

औरंगाबाद: अनेक ठिकाणी मतदान संथगतीने मतदान सुरु झाल्याच्या सोशल मीडियावर तक्रारी.

औरंगाबाद: शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी मतदान केले .

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

औरंगाबाद: रोशन गेट परिसरात गल्ली नंबर १० मधील मतदानाची रांग

जालना: भाजप प्रदेश अध्यक्ष उमेदवार रावसाहेब दानवे यांनी कुटुंबीयासह केले मतदान

भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा आणि काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचं यांच्या भवितव्याचाही आज फैसला

सुप्रिया सुळे, रावसाहेब दानवे, पार्थ पवार, गिरीश बापट, सुजय विखे, उदयनराजे भोसले या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

पुणे: कोथरुड येथील मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

बारामतीतील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनीही दौंडमध्ये केलं मतदान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क, भाजप पक्षाध्यक्ष अमित शहाही उपस्थित

माजी मंत्री सुरेश जैन यांनी कुंटुबीयांसह बजावला मतदानाचा हक्क

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी पत्नी अंजलीसह केले मतदान

अहमदाबाद: भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पत्नी सोनल यांच्यासह बजावला मतदानाचा हक्क

पुणे: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदानाचा हक्क बजावला

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!