Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

‘बारामतीत ‘राष्ट्रवादी पुन्हा’, भाजपा जिंकल्यास राजकारणातून निवृत्ती घेईन’

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अजित पवार यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना, भाजपाने बारामती जिंकल्यास राजकारणातून निवृत्ती घेईन, असे अजित पवार म्हणाले. तसेच, भाजपाने बारामतीत पराभव झाल्यास राजकारण सोडून द्यावे, असे आव्हानही पवार यांनी केले आहे.

महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते बारामतीत तळ ठोकून आहेत. बारामती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांना विजयी करण्यासाठी भाजपा नेत्यांनी कंबर कसली आहे. मात्र, काहीही झाली तरी बारामतीमध्ये राष्ट्रवादीच जिंकले, असा विश्वास अजित पवार यांनी बोलून दाखवला. मी आमदारकीसाठी उभा राहिलो, त्यावेळी मोदींनी बारामतीत सभा घेतली, जवळ-जवळ पाऊणलाख लोकं त्यांच्या सभेला हजर होती. तरीही, मी 1 लाख मतांनी निवडून आलो, असेही अजित पवार यांनी म्हटले. त्यामुळे, बारामतीत भाजपा जिंकली तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन, पण जर भाजपा हरली तर भाजपाने राजकारण सोडून द्यावं, असे चॅलेंजही अजित पवार यांनी केलंय.

पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर काय चर्चा सुरू आहे. पहिल्यांदा एकतर्फी निवडणूक म्हणणारी भाजपा आता काय म्हणतेय. कोल्हापूर आणि काही ठिकाणी थोडे मतभेद होते, पण शेवटी आम्ही महाआघाडी म्हणून एकत्र काम करतोय. कोल्हापुरात सतेज पाटील यांनीही पवारसाहेबांच्या शब्द मानून आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलंय, असेही पवार म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!