Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

स्मृती इराणींबद्दल अपशब्द; जयदीप कवाडेंना अटक आणि सुटका

Spread the love

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते जयदीप कवाडेयांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर जयदीप कवाडे यांची जामिनावर सुटका करण्यात आली. जयदीप कवाडे यांचे भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर महाराष्ट्र भाजपने त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या एका जाहीर सभेत जयदीप कवाडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींबद्दल अपशब्द वापरले. ‘स्मृती इराणी नितीन गडकरींसोबत राज्यघटना बदलण्यासंबंधी चर्चा करत असतात. मी तुम्हाला स्मृती इराणींबद्दल सांगतो. त्या आपल्या कपाळावर मोठं कुंकू लावतात. पण सतत पती बदलवणाऱ्या महिलांच्या कपाळावरचं कुंकूही वाढतच राहतं असं मी ऐकलंय’, असं वादग्रस्त वक्तव्य जयदीप कवाडे यांनी नागपूरच्या सभेत केलं होतं.

स्मृती इराणी संसदेत घटना बदलण्याची भाषा करतात पण त्यांना उत्तर देताना ते म्हणाले कि , ” संविधान बदलणे , नवरा बदलण्याइतके सोपे नाही . ” आणि सभेत एकाच हशा पिकला . त्यांचे हे भाषण काल व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर हि कारवाई झाली .

इराणींबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी जयदीप कवाडे यांच्याविरोधात निवडणूक अधिकारी मदन सुबेदार यांनी लकडगंज पोलिसात तक्रार दाखल केली होती. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. कलम ५०० अंतर्गत मानहानी, अपशब्द वापरल्याने कलम २९४ आणि निवडणुकीसंदर्भात खोटं बोलल्याचा आरोप करत कलम १७१ नुसार जयदीप कवाडे यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!