मी लढण्यासाठी तयार , औरंगाबाद लोकसभेच्या मैदानातून माघार नाही : आ. इम्तियाज जलील

औरंगाबाद लोकसभा एमआयएमने सोडलेली नाही, मी लढण्यासाठी तयार , औरंगाबाद लोकसभेच्या मैदानातून माघार नाही . ज्या दैनिकाने माझ्या माघारीची बातमी प्रसिद्ध केली ती विपर्यास करणारी आहे. असे प्रतिपादन एम आय एम चे आमदार इम्तियाज जलील यांनी महानायक ऑनलाईन शी बोलताना दिली . याबाबत माझे स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ मी जारी केला आहे . असेही आ . जलील म्हणाले .
पुढे बोलताना ते म्हणाले कि , माझे कार्यकर्ते एमआयएमच्यावतीने हि निवडणूक लढवावी म्हणून आग्रही आहेत. कुठल्याही धर्मगुसरूंशी आमचे असे काहीही बोलणे झालेले नाही, किंवा माझ्या उमेदवारीला कोणी विरोधही केलेला नाही. उलट मी माझ्या मतावर ठाम आहे. माझ्या पक्षाकडे मी केवळ औरंगाबादच्याच जागेची मागणी केली नाही तर वंचित बहुजन आघाडीकडे महाराष्ट्रात दोन जागांची मागणी केलेली असताना मी निवडणुकीच्या मैदानातून माघार कशी घेईल? माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे .
औरंगाबाद लोकसभेचे तिकीट मिळावे म्हणून मी आणि आमचे कार्यकर्ते आग्रही आहेत. आमचे नेते खा.असिदोद्दीन ओवैसी यांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. मला पक्षाने संधी दिल्यास मी उभे राहणार आणि शंभर टक्के निवडून येणार असा विश्वासही आ.इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला.