Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोदी-शाह विरूध्दच्या ठाम भूमिकेला तडा जात असल्याने , मी वंचित आघाडीतून बाहेर : न्या . कोळसे पाटील

Spread the love

मोदी-शहा विरोधात आपण घेतलेल्या भुमिकेला वंचित आघाडी तडा देत असल्याची खात्री पटल्याने आपण वंचित आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे कोळसे-पाटील यांनी म्हटले आहे. आपल्या फेसबुक अकाऊंटवर त्यांनी याबाबत सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे कि, मी “वंचित बहूजन आघाडी” चा बिनशर्त दिलेला पाठिंबा नाकारलेला आहे.  कारण: मी काल दुपारी माझे १९९१ पासूनचे परम मित्र ॲड.प्रकाश उर्फ बाळासाहेब यांच्याशी, माझे आदर्श पुरुष थोर महामानव डाॅ. बाबासाहेब यांच्या अभ्यासिकेत बसून चर्चा केली. सर्व गुणदोषासहित काॅंग्रेस पक्ष, जो की आज एकमेव पक्ष, जातीयवादी,विषारी विचारांच्या संघप्रणित भाजपाला रोखूं शकतो, त्यांच्या बरोबर आघाडी करण्यासाठी शेवटचा पण अनेंक अयशस्वी प्रयत्ना पैकी एक शेवटचा प्रयत्न केला.

मी गेली पांच वर्षे सातत्यानें घेतलेली, खूनी मोदी शाह विरूध्दच्या ठाम भूमिकेला, जी वंचित आघाडी त्याला तडा देत आहे याची खात्री झाल्यांवर त्यांचा दिलेला पाठिंबा मी ठामपणें नाकारलेला आहे.तसं त्यांनी मला सुरूंवातीपासूनच, अनेंकदां काॅंग्रेस बरोबर चर्चा करण्याचे कबूलही केलं होतं आणि मी स्वखुशीनें ती मध्यस्थी काल पर्यंत करीतही होतो. परंतु परवांच ॲड. बाळासाहेबांनी सर्व उमेदवार जाहिर करून चर्चेला पूर्ण विराम दिलेला आहे. माझी मदत मोदीला झाली तर मी कधींही मलाच माफ करू शकणार नाही.कारण कुणाचीही हिम्मत नसतांना मी मोदी शाह व संघमुक्त भारताची घोषणा केली होती.

सर्व जाती धर्मांतील आणि विशेषत: माझ्या मराठा-कुणबी,SC,ST,Muslim बहिणी भावांनो मी आपल्या सर्वांच्या सर्व दु:खाचे मूळ शोधून त्यांवर मात करून सर्वांना सुखी करण्यासाठी १९७६ पासून रात्रंदिवस काम करीत आहे. तसाच मी माझ्या शेवटच्या श्वासांपर्यंत या ब्राम्ह्यण्यवादी व भांडवलशाहीला विरोध करणारही आहेच.परंतु आपण सर्व भारतीय अजूनही मानसिक गुलामगिरीतच जीवन जगत अहोंत.”स्वतंत्र विचारांच्या पिढ्यांची निर्मिती हाच खरा विकास” या तत्वाला आमच्या देशांत थारा नाही.कारण स्वर्ग,नरक,३३ कोटी देव ही संकल्पना आमच्या सर्व तार्किक,बौध्दिक,वैज्ञानिक,विकासवादी विचारांना,हजारों वर्षे मारीत आलेली आहे.त्यांतून आम्हां भारतियांना बाहेर काढण्याची जबाबदारी आमच्या सारख्यां लाखों कार्यकर्त्याचीच आहे.त्यासाठी रात्रंदिवस आम्ही सर्व जण काम करायला बांधिलेले अहोंत. जय शिवराय, जय जिजाऊ, जय भीम.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!