Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पुलवामा हल्ल्याशी संबंधित १८ दहशतवाद्यांचा खात्मा : काश्मीरचे आयजी एस.पी.पानी

Spread the love

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने अतिरेक्यांविरोधातील आपली मोहिम अधिक तीव्र केली आहे. पुलवामाच्या हल्ल्यानंतर आतापर्यंत १८ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून यामध्ये पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद संघटनेचे सहा दहशतवादी आहेत असे लष्कराकडून सोमवारी सांगण्यात आले. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले.

पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड मुदस्सिर अहमद खान उर्फ मोहम्मद भाईला सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. दक्षिण काश्मीरमधील त्राल येथील चकमकीत तो मारला गेला. मुदस्सिरचा खात्मा हा जैशसाठी मोठा दणका आहे असे काश्मीरचे आयजी एस.पी.पानी यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. रविवारी रात्री त्राल येथील पिंगलिश परिसरात ही चकमक झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तीन दहशतवाद्यांमध्ये एक मुदस्सिर अहमद खान आहे. चकमकीत मारले गेलेले तिन्ही मृतदेह जळालेल्या अवस्थेत होते. त्यांची ओळख पटवण्यात आली आहे.

दहशतवाद्यांनी शोध घेणाऱ्या जवानांवर गोळीबार सुरु केल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली. मुदस्सिर अहमद खानबद्दल फार कमी जणांना माहिती आहे. १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यातील बसला स्फोटकांनी भरलेली गाडी धडकवण्यात आली. या हल्ल्याचा मास्टरमाईंड मुदस्सिर होता.पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या मुदस्सिरने आयटीआयमधून इलेक्ट्रिशनचा एक वर्षाचा डिप्लोमा केला होता. त्याचे वडील हे मजुरी करतात. फेब्रुवारी २०१८ मध्ये सुंजवा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही तो सहभागी होता. या हल्ल्यात सुरक्षादलाचे ६ जवान शहीद झाले होते. त्याचबरोबर एका नागरिकाचाही मृत्यू झाला होता. जानेवारी २०१८ मध्ये लेथपोरा येथे सीआरपीएफच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही त्याचे नाव समोर आले होते. या हल्ल्यात ५ सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. पुलवामा हल्ल्याचा तपास करत असलेल्या एनआयएच्या पथकाने २७ फेब्रुवारीला मुदस्सिरच्या घरावर छापा मारला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!