Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकसभा २०१९ : आज निवडणूक झाल्या तर कुणाला मिळेल बहुमत ? बघा तर खरं …

Spread the love

अखेर देशात १७ व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी आपली मोर्चेबांधणी पूर्ण केली असली तरी  आज जाहीर झालेल्या लोकसभा निवडणूक निमित्ताने एबीपी न्यूज आणि सी व्होटरने  केलेल्या सर्वेक्षणानुसार आज निवडणूक झाल्यास मतदाराचा कौल कुणाला मिळेल ? या प्रश्नाचे उत्तर शोधताना  भाजपा बहुमत गमावणार अशी माहिती समोर आली आहे. या सर्वेनुसार आज निवडणुक झाल्यास भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला २६४ जागा तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला १४१ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.  या कार्यक्रमानुसार देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. ११ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचा पहिला तर १९ मे रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल. तर २३ मे रोजी मतमोजणी होईल. दरम्यान, एबीपी न्यूज आणि सीव्होटरच्या सर्व्हेनुसार आज निवडणूक झाल्यास कुठलाही पक्ष किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. या सर्व्हेने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज निवडणूक झाल्यास भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला २६५ जागा मिळतील. तर यूपीएला १४१ जागा मिळतील. इतर पक्षांना १३८ जागा मिळण्याची शक्यता आहे. पक्षनिहाय पाहिल्यास भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपाला २२० जागा मिळतील. तर काँग्रेसला ८६ जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत एनडीएला ४१ टक्के, तर यूपीएला ३१ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर अन्य पक्षांना २८ टक्के मतदान होण्याची अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!