Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

औरंगाबाद लोकसभेतून माघार नाही , लढविणार : न्या . कोळसे पाटील यांचा निर्धार

Spread the love

वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेचा आदर ठेवून आपण औरंगाबाद लोकसभेची निवडणूक लढविणारच असा निर्धार निवृत्त न्यायमूर्ती बी.जी.कोळसेपाटील यांनी महानायक ऑनलाईनशी बोलताना केला. अखिल भारतीय मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही आपल्या उमेदवारीचे समर्थन केले असून कोणत्याही परिस्थितीत भाजप आणि मोदी सरकारला २०१९ मध्ये थांबवणे हि देशाची गरज झाली आहे त्यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील संविधानवादी आपल्या पाठीशी राहतील असाविश्वास त्यांनी व्यक्त केला.

एमआयएमच्या कुठल्याकार्यकर्त्यांनी विरोध केला याची माहिती आपल्याला नसून वंचित बहुजन आघडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्याचे उत्तर दिले आहे त्यामुळे या विषयावर मी काहीही बोलणार नाही.  विशेष म्हणजे मुंबईच्या सभेत मी स्वतः उपस्थित होतो या सभेत एम आय एम चे नेते खा . असदुद्दीन ओवेसी यांचीही भेट झाली आहे त्यामुळे विरोधाचा प्रश्नच कुठून आला . मी औरंगाबादला लवकरच येत आहे .आणिसर्वसंविधानवाडीजनताजाती-धर्माच्या वर्तुळाच्या बाहेर येऊन वंचित बहुजन आघाडीला मतदान करतील याबद्दल मला कुठलीही शंका नाही.त्यामुळे मी उभा राहणार यात कुठलीही शंका नाही.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवृत्त न्यायाधीशबी.जी.कोळसेपाटील यांना वंचित बहुजन आघाडीचे  नेते  प्रकाश आंबेडकर यांनी परभणीच्या सभेत उमेदवारी जाहीर केल्यानंतर या उमेदवारीचे स्वागत होत असतानाच गेल्या काही दिवसांपासून न्या.कोळसे पाटील यांच्या उमेदवारीवर नाराजी जाहीर करून औरंगाबादची जागा एमआयएमने लढवावी असा आग्रह एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी धरला असून हि उमेदवारी आमदार इम्तियाज जलील यांना द्यावी अशी मागणीही या कार्यकर्त्यांनी केली आहे.

२०१९ ची लोकसभा देशाचा पंतप्रधान कोण बनणार यासाठी नसून हि लढाई मोदी आणि भाजप यांना सत्तेवरून घालविण्यासाठी आहे.नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी हि लढाई नाही. हा गैर प्रचार प्रसार माध्यमे पसरवीत आहेत हे समजून घेण्याची गरज आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!