Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Masood Azhar : मसूद जिवंत आहे कि गेला ? भारत -पाकिस्तानात संभ्रम …

Spread the love

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याचा मृत्यू झाला आहे कि नाही यावरून भारत आणि पाकिस्तानातील  प्रसार माध्यमांच्या वृत्तांवरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे . या विषयी अनेक माध्यमांनी त्याचे निधन झाल्याचे  वृत्त देण्यात  आले होते पण काही माध्यमांनी त्यांच्या नातेवाईकाचा हवाला देऊन तो जिवंतच असल्याचे वृत्तही दिले आहे . पाकिस्तानातही यावरून मोठी चर्चा आहे. पाकिस्तान सरकारच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तो आजारी असून किडनीच्या आजाराने त्रस्त  असल्याचे वृत्त दिले होते . त्यामुळे त्याच्या मृत्यूच्या वृत्ताला पाकिस्तान सरकारने कुठलाही अधिकृत दुजोरा दिला नाही. दुसरीकडे जैश ए मोहम्मदनेही  हे वृत्त फेटाळले आहे . मसूद अजहर हा ठणठणीत असल्याचं पत्रक जैशने जारी केले असल्याचेही वृत्त आहे .

पाकिस्तानमधील माध्यमांनी मसूद अजहरचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मसूद अजहरचा मृत्यू झाल्याचं काही संस्था सांगत होत्या. तर मसूद अजहर हा भारतीय हवाई दलाच्या बॉम्ब हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. यामुळे त्याचा मृत्यू झाला, असा दावा पाकिस्तानमधील काही वृत्त संस्थांनी केला होता.  मसूद अजहर हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या म्हणून ओळखला जातो . भारतात दहशतवादी कारवायांसाठी त्याने पाकमध्ये प्रशिक्षण तळं उभारली आहेत. इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करण्यात आल्यानंतर प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी मसूदला भारत सरकारने एन डी ए सरकारच्या काळात १ डिसेंबर १९९९ ला मुक्त केले होते. तेंव्हापासून हा मसूद अझहर भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. त्याला दहशतवादी घोषित करून भारताच्या हवाली करावे अशी मागणी भारताने सातत्याने केली आहे. दरम्यान याबाबतचे वृत्त देणाऱ्या एका वेबसाईटचे वृत्त तत्काळ डिलीट करण्यात आल्याचे दिसले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!