Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Air Strike : शंका नाहीच, पण काय घडले त्याचे फोटो तर दाखवा : दिग्वीजय सिंग

Spread the love

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतरही हवाई दलाला पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करायचा होता, मात्र त्यावेळच्या मनमोहन सिंग सरकारने परवानगी दिली नाही हा पंतप्रदान नरेंद्र मोदींचा दावाही सिंह यांनी खोडून काढला. याविषयी मी पंतप्रधान नरेंद्र मोदींऐवढा खोटारडा व्यक्ती पाहिला नाही एवढंच म्हणू शकतो असं सिंह म्हणाले.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या एअर स्ट्राइकच्या कारवाईवर कोणतीही शंका नाहीये, पण हे तंत्रज्ञानाचं युग आहे, उपग्रहाद्वारे छायाचित्रे शक्य आहेत. लादेनचा खात्मा केल्यानंतर अमेरिकेने जगासमोर भक्कम पुरावे सादर केले होते, त्याप्रमाणे आपणही करायले हवेत असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेता आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह म्हणाले आहेत.
शनिवारी इंदोरमध्ये बोलताना सिंह यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका केल्याबदद्ल कौतुक केलं. इम्रान खान यांनी चांगले शेजारी असण्याचा नवा मार्ग दाखवला आणि आमचा शूर अधिकारी आम्हाला परत केला. आता त्यांनी अजून थोडी हिंमत दाखवावी आणि हाफिज सईद आणि मसूद अजहर यांसारख्या कुख्यात दहशतवाद्यांनाही भारताच्या हवाली करावं असंही सिंह म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी भारतीय हवाई दलाच्या कारवाईबाबत कोणतीही शंका नसल्याचं स्पष्ट केलं, पण सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. त्यामुळे उपग्रहाद्वारे छायाचित्रे शक्य आहेत. ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतर अमेरिकेने जगासमोर त्याच्या खात्म्याबाबतचे भक्कम पुरावे सादर केले होते. भारतानेही एअर स्ट्राइकचे पुरावे जगासमोर सादर करावेत असं सिंह म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!