Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Pulwama : पुलवामा हल्ल्याशी “जैश ” चा संबंध नाही : पाकिस्तान

Advertisements
Advertisements
Spread the love

पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेला हल्ला हा जैश-ए-मोहम्मदने केला नसल्याचं धक्कादायक विधान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमबद कुरेशी यांनी केलं आहे. खुद्द जैश-ए-मोहम्मदने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतरही पाकिस्तानच्या मंत्र्यांनी असं वक्तव्य केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. १४ फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याने हल्ला केला. हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारा व्हिडिओ त्यानंतर लगेचच जैश-ए-मोहम्मदनं प्रसिद्ध केला होता. त्यानंतर ‘जैश’चा म्होरक्या मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्तावही सध्या संयुक्त राष्ट्रसंघात आणण्यात आला आहे. इतकं सगळं झाल्यानंतरही ‘जैश’चा या हल्ल्याशी काही संबंध नाही, असं कुरेशी यांनी म्हटलं आहे. ‘पाकिस्तान सरकार सध्या ‘जैश’च्या संपर्कात आहे. ‘जैश’ने हल्ला केला नसल्याचं त्यांचं म्हणणं असल्याचं कुरेशी यांनी सांगितलं. भारतानं केलेला एअरस्ट्राइकही पोकळ असल्याचं कुरेशी म्हणाले. तसंच, पाकिस्तान सरकार दहशतवादाचं समर्थन करत नाही. मसूद अजहरविरोधात भारताने पुरावे दिल्यास आम्ही कारवाई करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!