Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

एफ-१६ चा गैरवापरा बद्दल अमेरिकेने विचारला पाकला विचारला जाब

Spread the love

अमेरिकेने पाकिस्तानशी एफ-१६ बाबत केलेल्या ‘एंड युजर’ करारानुसार, पाकिस्तान या विमानाचा उपयोग केवळ दहशतवादविरोधी कारवाया मोडून काढण्यासाठीच करू शकतो. मात्र, या कराराचे उल्लंघन करत पाकने भारतीय हवाई हद्दीत घूसखोरी करत भारतीय हवाई दलाच्या विमानांवर हल्ला केला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाकिस्तानने आपले एफ-१६ हे विमान भारताविरुद्ध वापरल्याबाबत अमेरिकेने पाकस्तानला जाब विचारला आहे. भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी एफ-विमान पाडल्याबाबतही पाकिस्तानी लष्कराने चुकीची माहिती दिली होती. मात्र, भारताने या विमानाचे कोसळलेले काही भाग जगापुढे आणून ही बाब स्पष्ट केली होती. अमेरिकने एफ-१६ या विमानांची निर्मिती केली असून पाकिस्ताने या विमानाद्वारे भारतीय हवाई हद्दीत घुसून भारतीय लष्करी चौक्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकेतील राज्य विभागाच्या प्रवक्त्याने याबाबत बोलताना सांगितले की, भारत आणि पाकिस्तान दरम्यान घडलेल्या घटनाक्रमाची आम्हाला माहिती आहे. आम्ही पाकिस्तानने केलेल्या दाव्याची पडताळणी करत आहोत. पाकिस्ताने एफ-१६ बाबतचा करार भंग केल्याबाबतची माहिती मिळालेली आहे. मात्र, गोपनीयतेच्या अटीमुळे आम्ही यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही. पाकिस्तानचे एफ-१६ हे विमान भारतीय वायू दलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी पाडले. या दरम्यान ते जखमी झाले होते. त्यांच्या विमानावर हल्ला झाल्यानंतर ते पॅराशूटने पाक व्याप्त काश्मीरमध्ये उतरले होते. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने त्यांना ताब्यात घेतले. पाकला चारी बाजूंनी घेरल्यानंतर अभिनंदन यांना पाकिस्ताने सोडून दिले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!