Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा जो पर्याय द्याल, तो मान्य करू : सोबत या, काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रकाश आंबेडकरांना विनंती पत्र

Spread the love

भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या रक्षणाची आणि देशातील लोकशाहीच्या रक्षणाची ही लढाई आपण सर्वांनी आघाडी करून एकत्रितपणे लढूया,  अशा शब्दात काँग्रेस – वतीने वंचित -बहुजन आघाडी आणि भारिप -बहुजन  महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना महा आघाडीत येण्याची विनंती करणारे लेखी पत्र  राधाकृष्ण विखेपाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेआहे.

या पत्रात त्यांनी म्हटले आहे कि, आम्ही आपल्या आवाहनाप्रमाणे निर्णय घेण्यास उत्सुक असून संघाला संविधानाच्या चौकटीत कसे आणायचे ? या बाबतीत आपण जो पर्याय आपण आम्हाला द्याल तो प्रस्ताव आम्हाला मान्य राहील असा शब्द देत  मोदी सरकारला थांबविण्यासाठी आपण समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. हे लक्षात घेऊन आपण निर्णय घ्यावा. जागांच्या बाबतीतही बसून चर्चा करण्याची आमची तयारी असल्याचे या पात्रात नमूद करण्यात आले आहे.

या पात्रात त्यांनी पुढे म्हटले आहे कि, देशामध्ये लवकरच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील. आतापर्यंत भाजपप्रणित मोदी सरकारचा देशभरातील कारभार पाहिल्यानंतर लक्षात येते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान डावलून या देशामध्ये पूर्णपणे मनमानी कारभार सुरु आहे. देशातील अल्पसंख्याक, दलित, आदिवासी आणि बहुजन समाजावर वेगवेगळ्या प्रकारे अन्याय व अत्याचार केला जात आहे. लोकशाहीचा कणा असलेले सर्वोच्च न्यायालय, भारतीय रिझर्व बँक, केंद्रीय अन्वेषन व्युरो अशा या देशातील महत्वपूर्ण संविधानिक संस्था मोडीत काढून मनमानी कारभार केला जात आहे.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले आहे, याची आपणास जाणीव आहेच. त्यामुळे ही लढाई मुळात लोकशाही प्रस्तापित करणारे संविधान विरुध्द भाजपप्रणित मोदी सरकार अशी लढाई आहे. या लढाईत आपल्यासारखे सर्व लोकशाहीवादी व संविधानवादी राजकीय पक्ष व संघटना या सर्वांनी एकत्रित येऊन लढण्याची आवश्यकता आहे. या दृष्टीने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सर्व समविचारी पक्षांशी चर्चा करीत आहे. याबाबत आपल्यासोबत सुध्दा वेगवेगळ्या स्तरावर अनेकवेळा प्रत्यक्ष व समविचारी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण महाआघाडीत एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केली. यामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीने चार जागा लढाव्यात असा मनोदय व्यक्त केला.

आपल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जाहीर सभांमध्ये आरएसएसला घटनेच्या चौकटीत आणण्याच्या संदर्भात काँग्रेस पक्षाकडून आपल्याला लेखी पत्र हवे असल्याचे समजते. आमची आपणास विनंती आहे की, आपण वरिष्ठ विधिज्ञ आहात, आपणास ज्या प्रकारचे पत्र हवे आहे, त्याचा मसूदा किंवा मुहे आपण पाठवले अथवा संयुक्तपणे चर्चा करुन आपणास हवे त्याप्रकारचे पत्र तयार करून ते सुध्दा आपण सर्वजण मान्य करु शकतो. जागा वाटपाच्या बाबतीतही कमीजास्त करण्याची चर्चा होऊन मार्ग निघू शकतो. त्यासाठी आपण महाआघाडीत यावे अशी आपणास विनंतीआहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!