Mamata Banerjee WB CM : मोदींनी उत्तर द्यावे : बॉम्ब कुठे फेकले ? हल्ल्यात किती लोक मेले ? ममता बॅनर्जी यांचा सवाल
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्रमोदी यांना प्रश्न विचारले आहेत.
१. भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर केलेल्या एअर स्ट्राईकची माहिती देण्यात यावी.
२. याबाबत आपण सर्वपक्षीयांची कुठलीही बैठक घेतली नाही, आता तरी आम्हाला सविस्तर माहिती देण्यात यावी.
३. पाकिस्तानात बॉम्ब नेमके कुठे फेकण्यात आले?
४. या हल्ल्यात किती लोक मेले?
५. माझ्या वाचण्यात आले आहे कि,या हल्ल्यात कुणीही मेलेले नाही.तर काही माध्यमांचे म्हणणे आहे कि, या हल्ल्यात फक्त एक व्यक्ती मेली आहे.
>>>> देशाला सविस्तर माहिती देण्यात यावी.