Indian Railway : रेल्वेत ग्रुप-डीसाठी निघाली १.३० लाख जागांसाठी जाहिरात
भारतीय रेल्वेत ग्रुप डी पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. रेल्वेने ग्रुप-डीसाठी तब्बल एक लाख जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीप्रक्रियेमध्ये आर्थिक आधारावर १० टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. RRC Group D Level-1 या मार्फत सर्व नव्या उमेदारांची भरती केली जाणार आहे. यामध्ये ट्रॅक मेंटेनर ग्रेड – ४, टेक्निकल डिपार्टमेंट्समध्ये इलेक्ट्रिकल, इंजिनिअर, मॅकेनिकल आणि सहायक हेल्पर या जागांसाठी नियुक्ती केली जाणार आहे.
२३ फेब्रुवारी रोजी रेल्वेने याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवार १२ मार्चपर्यंत अर्ज दाखल करू शकणार आहेत. अर्ज दाखल करण्याची फी ५०० रूपये आहे. एससी, एसटी आणि महिला वर्गांसाठी हे शुल्क २५० रूपये आहे. ग्रुप -डी व्यतिरिक्त पॅरामेडिकल स्टाफ, नॉन टेक्निकल पॉपुलर कॅटेगरी(टीसी, टाईपिस्ट, टीटीई आणि असिस्टेंट स्टेशन मास्टर )आणि मिनिस्ट्री या पदांसाठी ३० हजार जागा निघाल्या आहेत. यासाठीचे अर्ज २८ फेब्रुपासून निघणार आहेत.
ग्रुप-डी साठी या वेबसाईटवरून करा अर्ज
Central Railway: www.rrcer.com
North Western Railway: www.nwr.indianrailways.gov.in
Eastern Railway: www.rrcer.com
Southern Railway: www.rrcmas.in
East Central Railway: www.rrcecr.gov.in
South Central Railway: www.scr.indianrailways.gov.in
East Coast Railway: www.rrcecor.org
South Eastern Railway: www.ser.indianrailways.gov.in
Northern Railway: www.rrcnr.org
South East Central Railway: www.secr.indianrailways.gov.in
North Central Railway: www.rrcald.org
South Western Railway: www.rrchubli.in
North Eastern Railway: www.ner.indianrailways.gov.in
Western Railway: www.rrc-wr.com
Northeast Frontier Railway: www.nfr.indianrailways.gov.in
West Central Railway: www.wcr.indianrailways.gov.in