Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूकदारांचे स्वागत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Spread the love

‘नॅसकॉम टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरम 2019’ या जागतिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी आवश्यक असे पोषक वातावरण महाराष्ट्रात आहे. या क्षेत्राच्या वाढीसाठी राज्य तयार असून आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचे राज्यात स्वागत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. ‘नॅसकॉम टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरम 2019’ या जागतिक परिषदेत झालेल्या एका मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. येथील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये ही परिषद 22फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या परिषदेचे हे 27 वे वर्ष आहे. नॅसकॉमचे व्हाईस चेअरमन आणि विप्रोचे चिफ स्ट्रॅटजी अधिकारी रशिद प्रेमजी यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी नॅसकॉमच्या अध्यक्ष श्रीमती देबजानी घोष उपस्थित होत्या.
नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप फोरम 2019 या परिषदेची यावर्षीची संकल्पना ‘संधी आणि वास्तविकता’ अशी आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन शासनाकडून उपलब्ध असलेल्या संधीचा फायदा हा तळागळातील शेवटच्या माणसापर्यंत होणे आवश्यक आहे. या दृष्टीने राज्य शासनाने पावले उचलली आहेत. राज्य डिजिटली अग्रेसर आहे. ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे पोहोचण्यासाठीचा राज्याचा रोडमॅप तयार आहे. सन 2025 पर्यंत हे ध्येय गाठण्यासाठी कृषी विकासाचा दर 6 टक्के, औद्योगिक वृद्धीचा दर 13 टक्के तर सेवा क्षेत्राचा दर हा 15.5 टक्के असावा लागणार आहे. सेवा क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध आहेत. यासाठी कृषीबरोबरच सेवा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता उद्योगाची सांगड घालणारे ‘इंडस्ट्री 4.0’ हे धोरण अवलंबण्यात येत आहे. शासकीय कामकाजात उत्पादकता, सर्वसमावेशकता आणि पारदर्शकता आणण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून सुमारे 400 सेवा नागरिकांना ऑनलाइन उपलब्ध आहेत. सुमारे 55 लाख लोकांनी आतापर्यंत याचा वापर करून कागदपत्रांची व इतर शासकीय कामे पूर्ण केले आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक वितरण प्रणालीचे संगणकीकरण केल्याने सुमारे दहा लाख बोगस रेशन कार्ड रद्द करता आले असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!