Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : दलेर मेहंदीला का झाली दोन वर्षांची शिक्षा ?

Spread the love

नवी दिल्ली : पंजाबच्या पटियाला न्यायालयाने गुरुवारी गायक दलेर मेहंदीला मानवी तस्करीप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. आता त्याची रवानगी पटियाला जेलमध्ये करण्यात आली आहे. पटियाला पोलिसांनी त्याला आधीच ताब्यात घेतले आहे. दलेर मेहंदीला जेएमआयसी पटियालाने १६.०३.१८ रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

पतियाळा पोलीस ठाण्यात या प्रकरणात एफआयआर क्रमांक ४९८ दिनांक २७/०८/०३ अन्वये ४०६,४२०,१२० बी, ४६५,४६८,४७१ आयपीसी आणि भारतीय पासपोर्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.   एच.एस. ग्रेवाल यांच्या  न्यायालयाने आरोपी गायक दलेर मेहंदीला अपीलविरुद्ध दोन  वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २००३ मधील कबुतरखान्याची ही घटना आहे. या प्रकरणी दलेर मेहंदी आणि त्याच्या भावावर एकूण ३१ गुन्हे दाखल आहेत.

असे आहे प्रकरण ?

२००३ मध्ये दलेर मेहंदीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बेकायदेशीरपणे लोकांना परदेशात पाठवल्याचा आरोप त्याच्यावर होता. हे करण्यासाठी दलेर मेहंदीने लोकांकडून मोठी रक्कम वसूल केल्याचे सांगण्यात आले. १९९८ ते १९९९  दरम्यान दलेर मेहंदीने सॅन फ्रान्सिस्को आणि न्यू जर्सीमध्ये किमान १० लोकांना बेकायदेशीरपणे पाठवून दिले होते. यानंतर दलेर मेहंदी आणि त्याचा भाऊ शमशेर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन्ही भाऊ लोकांना परदेशात नेण्यासाठी ‘पॅसेज मनी’ म्हणजेच एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठीची फी च्या नावाखाली १ कोटी रूपये घ्यायचे. परंतु लोकांच्या तक्रारींनुसार, हा करार कधीच पूर्णत्वास गेला नाही. आणि त्यांचे पैसेही परत केले गेले नाहीत. २००६ मध्ये दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील त्यांच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला होता. तेथून केस फाईलची कागदपत्रे आणि उताऱ्याचे पैसे जप्त करण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!