Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HingoliNewsUpdate : स्वाधार योजनेची शिष्यवृत्ती तत्काळ देण्याची मागणी

Spread the love

हिंगोली : प्रभु नांगरे : राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने मागासवर्गीय अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनाला आधार म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शिष्यवृत्ती दिली जाते, मात्र गेल्या वर्षीपासून विद्यार्थ्यांनी कार्यालयात प्रस्ताव अर्ज सादर करून ही अद्याप विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळालेली नाही , हि शिष्यवृत्ती तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली आहे.

हि शिष्यवृत्ती न मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षांमध्ये त्यांना आर्थिक मोठी चणचण भासत असल्याने शैक्षणिक समस्यांना मोठे तोंड द्यावं लागत असल्याच्या तक्रारी संघटनेकडे येत असल्याने भीम टायगर सेना हिंगोली जिल्हा अध्यक्ष गजानन दादा वैद्य यांच्या वतीने समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देऊन येत्या दहा दिवसात ए.एन.एम. व जी.एन.एम. सह व्यवसायिक व बिगर व्यावसायिक सर्व पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्याला लवकरात लवकर, तात्काळ शिष्यवृत्ती जमा करावी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्रात येणारी आर्थिक अडचण दूर करण्यास सहकार्य करावे. अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने सहायक आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

यावेळी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन दादा वैद्य सह पदाधिकारी बंडू नरवाडे, अनिल दिपके, सतीश इंगळे,प्रवीण पातोडे, बाळूभाऊ कुऱ्हे, निलेश पठाडे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!