Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : चर्चेतली बातमी : झी न्यूज चे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनी का दिला आपला राजीनामा ?

Spread the love

नवी दिल्ली : आपल्या डीएनए कार्यक्रमामुळे संघ आणि भाजपच्या हिंदुत्ववादाला नेहमीच आक्रमक पद्धतीने मांडणारे झी न्यूजचे मुख्य संपादक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर चौधरी यांनी राजीनामा दिला असल्याचे वृत्त आहे. झी मीडियाच्या हेड एचआर रुचिरा श्रीवास्तव यांना  कंपनीचे प्रमुख सुभाषचंद्रा यांनी पाठवलेल्या मेलमध्ये या राजीनाम्याची  पुष्टी करण्यात आली आहे.

झी न्यूजच्या एचआर हेड रुचिरा यांना  पाठवलेल्या मेलमध्ये सुभाषचंद्रा यांनी असे म्हटले आहे की- झी न्यूजसोबत 10 वर्षांच्या प्रवासानंतर सुधीर चौधरी स्वतःचा उपक्रम सुरू करणार आहेत. त्यांच्या इच्छेला मान देत कंपनीने त्यांचा राजीनामा जड अंत:करणाने स्वीकारला आहे. त्यामुळे आता झी न्यूज, झी बिझनेस आणि झी २४ तासचे संपादक पुढे अध्यक्षांना अहवाल देतील तर  ग्रुप स्ट्रॅटेजी आणि इनोव्हेशन,  विऑनचे संपादक थेट प्रकाशकाला अहवाल देतील.

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा होती. सुधीर चौधरींनी तीन दिवसांपूर्वी डीएनए शोमधून माघार घेतली होती. त्याचा शो झी हिंदुस्थानचा अँकर रोहित रंजन होस्ट करत होता. सुधीर यांच्या राजीनाम्यानंतर आता झी मीडिया समूहाचे मालक सुभाष चंद्रा यांचे एक पत्रही समोर आले आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे कि ,  “मी दोन दिवसांपासून सुधीरचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. पण  त्यांना त्यांच्या  त्याच्या फॅन फॉलोइंगचा वापर करून स्वतःचा एक उपक्रम सुरू करायचा आहे. म्हणून मी त्यांनी राजीनामा स्वीकारला आहे आणि त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कृपया लवकरात लवकर त्यांच्या  खात्याचा निपटारा करा.” सुधीर चौधरी यांनी १ जुलै रोजी आपला राजीनामा सुभाष चंद्र यांना पाठवला होता. ज्याच्या उत्तरात त्यांनी कंपनीच्या एचआरला ही माहिती दिली आहे.

कंपनीने शुक्रवारी स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की चौधरी यांचा राजीनामा १ जुलै २०२२ च्या ट्रेडिंग कालावधीच्या समाप्तीपासून लागू झाला आहे. त्यांच्या राजीनाम्याचे कारण याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. झी मीडिया कॉर्पोरेशनने सांगितले की, “सुधीर चौधरी यांनी कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर सुधीर चौधरी यांनी राजीनाम्याच्या पत्रात सुभाष चंद्र यांच्याकडे आशीर्वादही मागितले आहेत.” कंपनीने चौधरी यांच्या जागी मुख्य व्यवसाय अधिकारी अभय ओझा यांची मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!