Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UdaypurNewsUpdate : video : कन्हैय्यालाल हत्या प्रकरणातील आरोपींना १० दिवसांची न्यायालयीन कोठडी

Spread the love

उदयपूर : उदयपूरमधील टेलर कन्हैय्या लाल तेली यांच्या हत्येप्रकरणातील चार आरोपींना शनिवारी जयपूर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपींना न्यायालयात घेऊन जात असताना संतप्त जमावाने त्यांच्यावर हल्ला केला आहे. नागरिकांनी आरोपींना मारहाण करत त्यांचे कपडे फाडले आहेत. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.

संबंधित आरोपींविरोधात लोकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. ‘आरोपींना मरेपर्यंत फाशी द्या’ अशा घोषणा देणाऱ्या लोकांना रोखण्यात पोलिसांची दमछाक झाली. आरोपींना पोलीस व्हॅनमध्ये परत घेऊन जात असताना, जमावाने त्यांच्यावर हल्ला केला.

नेमकं प्रकरण काय आहे?

भारतीय जनता पार्टीच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत अवमानकारक टिप्पणी केली होती. त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत असताना, मृत कन्हैय्या लाल यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. याचाच राग मनात धरून आरोपी मोहम्मद रियाझ आणि घौस मोहम्मद यांनी २८ जून रोजी कन्हैय्या लाल यांची निर्घृण हत्या केली. क्रूरतेचा कळस म्हणजे आरोपींनी हत्या करतानाचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्याच व्हिडीओतून आरोपींनी हत्येची कबुली देखील दिली होती.

या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याच दिवशी दोन्ही मुख्य आरोपींना अटक केली. त्यानंतर आसिफ हुसेन आणि मोहसीन खान यांना देखील पोलिसांनी अटक केली. शनिवारी आरोपींना तोंड झाकून जयपूर न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. त्यानंतर राजस्थान पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे एनआयएकडे सोपवली आहेत. या घटनेचा पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) केला जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!