Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AccidentNewsUpdate : विचित्र तिहेरी अपघातात ४ जण ठार …

Spread the love

कोल्हापूर  : पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर किणी येथे आज पहाटे झालेल्या एका विचित्र अपघाताच चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत बंद पडलेल्या कंटेनरला एका कारने मागून धडक दिली. यानंतर अपघातग्रस्त कारला एका ट्रकने मागून धडक दिली. ही घटना इतकी भयंकर होती की या तिहेरी अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ११ वर्षीय मुलीचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेमध्ये मृत्यू झालेले चारही जण बंगळुरू येथील रहिवासी होते.या अपघातानंतरचे घटनास्थळावरील काही व्हिडिओही समोर आले आहेत. यामध्ये गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. झालेल्या या विचित्र अपघातात चार जण ठार झालेत आहेत.

आज पहाटे हा अपघात घडला. एक्सेल तुटल्याने  पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उभ्या  असलेल्या ट्रकला महिंद्रा कार जाऊन धडकली तर कारच्या मागून येणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रकही अपघातग्रस्त कारला मागून धडकला. या विचित्र अपघातात कारचा चेंदामेंदा झाला असून कारमधील तिघे जागीच ठार झाले तर एक जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत सर्व बंगळुरू येथील एकाच कुटुंबातील आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!