Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : महाडिक यांच्या विजयानंतर फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर हल्ला बोल…

Spread the love

मुंबई  : राज्यसभेच्या लढाईत भाजपाने बाजी मारल्यानंतर भाजपकडून राज्यात जल्लोष केला जात आहे. याबाबत बोलताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले कि , हि लढाई छोटी होती. मोठी लढाई अजून बाकी आहे. येत्या काळात सगळीकडे या सरकारला दणके देऊ. २०२४ ला भाजपा केंद्रात आणि राज्यात सरकार आणेल, यावर मला विश्वास आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी उत्साह कायम ठेवा. आता सुरूवात झाली आहे. राज्यात आणि मुंबई पालिकेवर भाजपाचा भगवा लावायचाय हे लक्षात ठेवा”, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रतिक्रिया दिली.


मुंबईतील भाजपा कार्यलयाजवळ झालेल्या विजयोत्सवाच्या वेळी ते बोलत होते. त्यावेळी राज्यसभेवर निवडून आलेले खासदार पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक या तिघांचेही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. फडणवीस म्हणाले कि , कोल्हापूरचे पैलवान धनंजय महाडिक यांनी शिवसेनेला छोबीपछाड दिला. त्यांचे अभिनंदन. मी काल बोललो होतो की आपला विजय लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांना समर्पित आहे. काहीही झालं तरी मतदान करणार या भावनेने ते आले. त्यांच्यामुळे आमची तिसरी जागा आली. आपण जिंकल्याने काहींच्या  तोंडचं पाणी पळालं तर काही पिसाटले आहेत. पण जिंकल्यावर नम्रता सोडायची नसते, त्यामुळे जल्लोष करा पण उन्माद नको.

महाविकास आघाडीवर देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र

शिवसेनेला कोणी मतं दिली नाहीत हे त्यांना खरंच माहिती असेल तरीही ते काही करु शकत नाहीत. कारण भाजपाला मदत करणाऱ्यांवर जर त्यांनी कारवाई केली तर महाविकास आघाडीतील अनेक जण त्यांना सोडून जातील. विधानपरिषद निवडणूक पण कठीण आहे. सदसदविवेक बुद्धी स्मरून तेथे भाजपाला जास्त मतदान होईल. सरकार व मुख्यमंत्र्यांनी  यावर अंतर्मुख होऊन विचार करायची गरज आहे. केवळ भाजपाशी लढायचे  म्हणून महाराष्ट्राचे  नुकसान महाविकास आघाडी करत आहे. शेतकऱ्यांची अवस्था वाईट. विमा कंपन्यांचा फायदा. सरकार गप्प आहे. शेतमाल खरेदीची अवस्था वाईट आहे. मोदींच्या कामावर विश्वास ठेवून महाराष्ट्राने सत्ता दिली, पण सत्तेचा अपमान झाला. आता हे सरकार तरी चालवून दाखवा असे आव्हानही फडणवीस यांनी यावेळी दिले.

विधानपरिषद निवडणुकीच्या ६ जागा आपण लढवतो आहोत. कोणतीही निवडणूक सोपी नसते. पण सरकारमधील अंर्तविरोध पाहता आणि ‘सिक्रेट बॅलेट वोट’ सिस्टीम पाहता आपल्याला चांगलं मतदान होईल. सद्सदविवेकबुद्धीला स्मरुन अनेक आमदार आपल्याला मतदान करतील, असा विश्वासही  देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!