Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : अरे रे किती वाईट ? विवाहितेने सहा मुलांसह विहिरीत घेतली उडी ….

Spread the love

रायगड : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील खरवली येथे एका महिलेने स्वतःच्याच ६ मुलांना विहिरीत फेकून ठार केले. स्वत: महिलेनेही जीव देण्याचा प्रयत्न केला, परंतु  लोकांनी या महिलेचा जीव वाचला, मात्र सहाही मुलांचा बुडून मृत्यू झाला. सोमवारी हि घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडितांमध्ये पाच मुली आणि एका मुलाचा समावेश आहे.


रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिलेल्या माहितीनुसार- आईचे नाव रुना चिखुरी साहनी आहे. पोलिसांनी ३० वर्षीय आईविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. त्यांनी सांगितले कि , ३० वर्षीय महिलेने तिच्या पतीच्या कुटुंबीयांनी मारहाण केल्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले. या हृदयद्रावक घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. मृत मुलं ही वय वर्ष ६ महिने ते १० वर्ष अशी होती.

Click to listen highlighted text!