Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सुरुवात नवाब मलिक यांनी केली, आता शेवट मी करणार : देवेंद्र फडणवीस

Spread the love

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्स पेडलरसोबत संबंध आहेत त्यांच्या संरक्षणानेच राज्यात ड्रग्सचा धंदा सुरु असल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सुरुवात नवाब मलिक यांनी केली आहे. आता शेवट मी करणार. त्यांनी लवंगी लावली, आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेले कनेक्शन उघड करणार असून, त्याचे पुरावे शरद पवार यांनाही देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई क्रुझवर एनसीबीने केलेल्या कारवाईनंतर राज्यात ड्रग्स प्रकरणावरुन राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक आरोप प्रत्यारोप केले आहेत. दरम्यान, तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी निशाणा साधला होता. त्यानंतर आता हे प्रकरण भाजपाशी जोडले गेले आहे. नवाब मलिकांनी सकाळी ट्विटरवर देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो ट्विट केला. त्यानंतर भाजपाचे ड्रग्स पेडलरशी काय कनेक्शन? असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांवर आरोप लावले. आता यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन नवाब मलिकांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिले आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर म्हटले की, चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते. असे अमृता फडणवीसांनी म्हटले आहे.

ड्रग्स पेडलर असलेला जयदीप राणा हा सध्या तुरुंगात आहे. त्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे. काही वर्षांपूर्वी अमृता फडणवीस यांचे नदी संरक्षणाबाबत एक गाणे  आले होते. त्या गाण्यामध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनीही काम केले होते. तर अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी गायन केले होते. त्या गाण्याच्या निर्मितीसाठीचा फायनान्शियल हेड म्हणून जयदीप राणा काम पाहत होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. दरम्यान, त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरहि निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज पेडलर यांच्यासोबत संबंध आहेत. या सगळ्या खेळामध्ये प्रतीक गाभा हा मुख्य खेळाडू असून, त्याच्याबाबत उलगडा लवकरच करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच नीरज गुंडे हा देवेंद्र फडणवीस यांचा वाझे असून, त्याचा उद्धव ठाकरेंशी संबंध नाही. मात्र युती सरकारमध्ये भाजपा आणि शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर नीरज गुंडे फडणवीस यांचा निरोप घेऊन उद्धव ठाकरेंकडे जात होता, असा दावा मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांना तातडीने पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. त्यात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवाब मलिक सध्या कोणत्या मानसिकतेमध्ये आहेत, हे सर्वांना माहिती आहे. नवाब मलिक यांनी लंवगी फटाकडी लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहे. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत अशा लोकांनी माझ्याबाबत बोलू नये आणि, आणि ड्रग्सबाबतही बोलू नये. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेले कनेक्शन उघड करणार असून, याचे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनाही देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!