Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Extortion case: अनिल देशमुख ईडीसमोर हजर, विचारले ‘परमबीर सिंह आहेत कुठे?’

Spread the love

अनेक दिवसांपासून गायब असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज अचानक समोर आले. त्यांनी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजेरीही लावली,पण त्या आधी त्यांनी एक व्हिडिओ ट्वीट करून आपली बाजू मांडली आहे. तसेच समोर येताच त्यांनी सर्वात आधी परमबीर सिंग यांच्या ठावठिकाण्याची चौकशी केली.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या खंडणीचे आरोप केल्यानंतर अनिल देशमुख खऱ्या अर्थाने अडचणीत आले होते. परमबीर यांच्या आरोपांनंतर राजकीय विरोधकांनी राज्य सरकारला घेरले. त्यामुळे देशमुख यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. नंतर सीबीआय व ईडीने देशमुख यांची चौकशी सुरू केली. त्यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचेही आरोप झाले. त्यांच्या घरी व कार्यालयात ईडीने धाडी टाकल्या. अनिल देशमुख प्रकृतीच्या कारणास्तव ईडीच्या चौकशीला हजर नव्हते आणि नंतर ते ‘नॉट रिचेबल’ झाले. आज बऱ्याच दिवसांनंतर ते समोर आले आहेत. समोर येताच त्यांनी सर्वात आधी परमबीर सिंग यांच्या ठावठिकाण्याची चौकशी केली. ‘माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग कुठे आहेत?,’ असा प्रश्न त्यांनी केला. ‘परमबीर सिंग विदेशात पळून गेल्याचे वृत्त आहे. आरोप करणारेच पळून गेलेत. त्यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. आज त्यांच्याच विरोधात पोलीस खात्यातील लोकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत’ याकडेही अनिल देशमुख यांनी लक्ष वेधले.

‘ईडीच्या चौकशीला मी सुरुवातीपासून सहकार्य केले आहे. ज्या-ज्या वेळी मला समन्स आले, त्यावेळी मी ईडीला उत्तर पाठवलं होते. माझी याचिका उच्च न्यायालयात आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायलयातही मी याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वत: ईडीच्या कार्यालयात येईन, असे मी ईडीला कळवले होते. ज्या ज्या वेळी ईडीने माझ्या घरांवर छापे टाकले, त्यावेळी माझ्या कुटुंबीयांनी, कर्मचाऱ्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले. मी स्वत: सीबीआयच्या कार्यालयात दोनदा हजर राहून माझे म्हणणे मांडले. अजूनही माझी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. पण आज मी स्वत: ईडीच्या कार्यालयात हजर राहिलोय,’ असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!