Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : Good News देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत होते आहे घट

Spread the love

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांमध्ये देशात २५ हजार ४०४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या तीन लाख ६२ हजार २०७ झाली आहे. तर काल दिवसभरात ३७ हजार १२७ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता तीन कोटी २४ लाख ८४ हजार १५९ वर पोहोचली आहे. दरम्यान देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.५८ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर गेल्या ८१ दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचा साप्ताहिक दर सातत्याने तीन टक्क्यांच्या खालीच आहे.

देशात काल दिवसभरात ३३९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोविड आजारामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या आता चार लाख ४३ हजार २१३ वर पोहोचली आहे. देशात कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या आता ७५ कोटी २२ लाख ३८ हजार ३२४ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात ७८ लाख ६६ हजार ९५० लस देण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. गेल्या काही दिवसांपासून देशात सुरू असलेला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव काहीसा ओसरताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या दैनंदिन आकडेवारीनुसार, करोना रुग्णसंख्येत आणि मृतांच्या संख्येतही गेल्या काही दिवसांपासून चढउतार दिसून येत आहे.


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!