Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : दिल्ली दंगल प्रकरणातील पोलिसांचा अहवाल बकवास , उमर खालिदच्या वकिलाचा युक्तिवाद

Spread the love

नवी दिल्ली : जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदच्या वकिलाने आज (शुक्रवार) दिल्ली न्यायालयात सांगितले की, यूएपीए अंतर्गत ईशान्य दिल्ली दंगलीच्या खटल्यात त्यांच्या अशीलाविरोधात दाखल केलेले आरोपपत्र त्याला सांप्रदायिक म्हणून दर्शवते. तथापि, “हा अहवाल तयार करणारा अधिकारी आणि त्याचे मन सांप्रदायिक होते”. असा प्रतिवादही त्यांनी यावेळी केला. फेब्रुवारी २०२० मध्ये ईशान्य दिल्लीतील दंगलीत झालेल्या हिंसाचारात ५३ जण ठार, तर सातशेहून अधिक लोक जखमी झाले होते. या दंगलींचे ‘सूत्रधार’ असल्याच्या आरोपाखाली इतर अनेकांसह खालिदवर यूएपीए या कठोर दहशतवादविरोधी कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उमर खालिदच्या बाजूने वरिष्ठ वकील त्रिदीप पैस यांनी युक्तिवाद केला, अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमिताभ रावत यांच्यासमोर युक्तिवाद करताना ते म्हणाले कि , आरोपपत्र दूरचित्रवाणी वाहिनीच्या एखाद्या स्क्रिप्टसारखे वाटत होते. तसेच, हॅरी पॉटरमधील खलनायक व्होल्डमोर्ट यासह काही उदाहरणे देत वकील त्रिदीप पैस म्हणाले की, पोलिसांचा अंतिम अहवाल हा बकवास आहे आणि त्यामुळे याप्रकरणात कुणालाही अटक करण्यात येऊ नये. दरम्यान त्यांचा युक्तिवाद पूर्ण होऊ न शकल्याने सोमवारपर्यंत न्यायालयाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

दरम्यान दिल्लीत झालेल्या दंगलींबाबत पोलिसांच्या दाव्यात अनेक विसंगती असून हे आपल्याविरुद्ध ‘रचलेले’ प्रकरण आहे, असे ईशान्य दिल्लीतील दंगलींचा कट रचल्याबद्दल बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली (यूएपीए) अटक करण्यात आलेला जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याने सोमवारी दिल्लीतील एका न्यायालयाला सांगितले होते. खालिदच्या महाराष्ट्रातील ज्या भाषणाचे वर्णन अभियोजन पक्षाने ‘प्रक्षोभक’ असे केले होते, त्याची २१ मिनिटांची दृश्यफीत वकिलांनी दाखवली. या भाषणात आपल्या अशिलाने हिंसाचाराचे कुठलेही आवाहन केले नाही, उलट लोकांना एकतेचा संदेश दिला, असा युक्तिवाद त्यांनी केला.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!