Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : भारत कधीही तालिबानी देश बनू शकत नाही , RSS, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला पाठिंबा देणारे सारखेच : जावेद अख्तर

Spread the love

मुंबई : भारत हा देश मुळात धर्मनिरपेक्ष देश आहे. इथली बहुसंख्य लोकसंख्या धर्मनिरपेक्ष आहे त्यामुळे तालिबान्यांच्या विचारसणीचा भारतीयांवर प्रभाव पडणार नाही. भारत कधीही तालिबानी देश बनू शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन लोकप्रिय गीतकार आणि लेखन जावेद अख्तर यांनी केले असून तालिबानान्यांचे समर्थन करणाऱ्यांवर त्यांनी टीकास्त्र सोडले आहे. तालिबानचे कृत्य रानटी असून नक्कीच ते निंदनीय आहे.. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी तालिबान समर्थकांच्या विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दरम्यान जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणारे देखील तालिबानी विचारसरणीचे असल्याची टीकाही केली आहे. जावेद अखातर यांनी पुढे म्हटले आहे कि, देशातील अवघे काही मुस्लीमच तालिबानच समर्थन करताना दिसतात. मला त्यांची वक्तव्य लक्षात नाहीत मात्र हे लोक मूठभर असल्याने त्यांना जे हवं ते बोलू द्यावं यातून ते काहीही साध्य करू शकणार नाहीत. त्यांच्या आधी प्रसिद्ध अभिनेते नासिरुद्दीन शहा यांनीही तालिबानी समर्थकांवर टीका केली आहे.

पुढे ते म्हणाले, “जगभरतील उजव्या विचारसरणीच्या लोकांना हेच हवे आहे. ज्याप्रमाणे तालिबानला इस्लामिक राज्य हवे आहे, त्याचप्रमाणे इथे अनेकांना हिदू राष्ट्र हवे आहे. हे सर्व एकाच विचारसणीचे आहेत. मग ते मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू किंवा हिंदू असो.” पुढे जावेद अख्तर म्हणाले, ” निश्चितच तालिबानी रानटी आहेत मात्र जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला पाठिंबा देत आहेत ते देखील अशाच मानसिकतेचे आहेत..ज्याप्रमाणे तालिबानने अफगाणिस्तानमध्ये एका आठवड्यामध्ये उद्रेक करत सत्ता मिळवली ते पाहता हे पूर्व नियोजित असल्यासारखे वाटत आहे. अमेरिका सरकार आणि तालिबान यांचा डाव असल्याचं हे वाटत आहे.” असेही ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!