Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime Update : चौघांनी ट्रक समोर स्काॅर्पिओ आडवी लावून ट्रक पळवला,गुन्हा दाखल

Spread the love

औरंगाबाद – जालन्याकडून पुण्याला जाणारा लोखंडी सळयाने भरलेला ट्रक देवगिरी फोर्जिंग कंपनी परिसरात बुधवारु पहाटे ५.३०वा.चौघांनी समोर स्काॅर्पिओ जीप आडवी लावून ड्रायव्हरला मारहाण करंत पळवला.व रस्त्यात ड्रायव्हरचा चेहरा झाकून त्याला ढकलून दिले.या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा
गुन्हा दाखल झाला आहे.उमेश बापू सोनवणे(३९) रा.वाफेगाव जि.सोलापूर असे फिर्यादीचे नाव आहे.

जालना येथून कालीका स्टील चे अंदाजे २०किलो.लौखंड पुणे कात्रज ला जाण्यासाठी बुधवारी पहाटे २वा.जालन्याहून ट्रक मालग रामचंद्र हरगे यांच्या सांगण्यावरुन निघाला.वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत देवगिरी फोर्जिंग च्या परिसरात चार अज्ञात इसमांनी बुधवारी पहाटे ५.३०च्या सुमारास ट्रक समोर स्काॅर्पिओ जीप आडवी लावत ट्रक् च्या दोन्ही दरवाजातून आत प्रवेश मिळवला.ट्रक चालक उमेश सोनवणे याचा चेहरा व हातपाय बांधून त्याला जीप मधे कोंबले व ट्रक पळवून नेला. व सोनवणे यांना धुळे महामार्गावर जीप मधून ढकलून पसार झाले. तो पर्यंत सकाळचे साडेसहा वाजले होते.

दरम्यान फिर्यादी सोनवणे खुलताबाद, छावणी पोलिस ठाण्याचा प्रवास करंत वाळूज पोलिस ठाण्यात पोहोचले.दरम्यान ट्रक मालक रामचंद्र हरगे यांनी दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्याच परिसरातील दिलीप लेंगरे यांच्याकडून नोटरी करुन ट्रक चालवावयास घेतल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज पोलिस करंत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!