Aurangabad Crime Update : तीन वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण

औरंगाबाद : बुधवारी मध्यरात्री धूत हाॅस्पिटल समोरील झोपडीमधे राहणार्या मजूराच्या तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
दिपाली राहूल इंगळे (३) उंची अडीच फुट रंग गोरा असे पहरण झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.या प्रकरणी तिची आई रेणूका राहूल इंगळे(२५)यांच्या फिर्यादीवरुन अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुुुढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत