Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट

Spread the love

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात ४० हजारांच्या आसपास रुग्ण समोर येत आहेत. मात्र शनिवारी गेल्या २४ तासांत ३६ हजार ०८३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर ४९३ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ३८,६६७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, देशभरात गेल्या २४ तासांत ३७,९२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून देशातील सक्रिय रुग्णांमधे घट होत असताना दिसत आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत ३ कोटी २१ लाख ९२ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ३ कोटी १३ लाख ७६ हजार बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्या ३ लाख ८५ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत ५४ कोटी ३८ लाख ४६ हजार २९० कोरोनावरील लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर गेल्या २४ तासांत ७५ लाख ५० हजार ५५३ नागरिकांना लस देण्यात आली आहे.

केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण
केरळमध्ये कोरोनाबाधितांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये १,३९,२२३ नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आल्यानंतर १९,४५१ लोकांची चाचणी सकारात्मक आली. तर १०५ रुग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.

महाराष्ट्रातील परिस्थिती

राज्यात शनिवारी दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्यांपेक्षा नवीन बाधितांची संख्यी ही अधिक आढळली आहे. याशिवाय, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी भर पडली आहे. शनिवारी दिवसभरात राज्यात ५ हजार ७८७ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ५ हजार ३५२ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. याचबरोबर १३४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!