Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : महाराष्ट्र हेच तुमचे कुटुंब , नव्या पोलीस उपनिरीक्षकांना मुख्यमंत्र्यांचा संदेश

Spread the love

नाशिक:  प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडल्यानंतर आता तुमची भूमिका व्यापक झाली आहे. आता संपूर्ण महाराष्ट्र हेच तुमचे कुटुंब आहे. या कुटुंबाला आता तुमचा आधार असणार आहे. तुमच्या स्वप्नात आता महाराष्ट्राचे स्वप्न मिसळून पाहावे लागणार आहे. तुम्हाला रक्षक, भाऊ, पुत्र म्हणून काम करावे लागणार आहे. लोक तुमच्याकडे विश्वासाने येणार आहेत. त्या जनतेचा विश्वास तुम्ही सार्थ ठरवाल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

चित्रपटातील आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. खऱ्या पोलिसांना जमिनीवर राहून काम करावे लागते. त्यांच्या प्रत्येक कृतीवर प्रश्न विचारला जातो. केले तर का केले आणि नाही केले तर का नाही केले? याचेही उत्तर द्यावे लागते ‘ असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील उपनिरीक्षकांच्या ११८ व्या सत्राचा दीक्षांत संचलन समारंभ नुकताच पार पडला. या प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलिसांच्या कामाचे  कौतुक करताना ते पुढे म्हणाले कि , पोलीस आज एका बाजूला नक्षलवादाचा आणि दुसऱ्या बाजूला करोनाचा मुकाबला करत आहेत. दिसणाऱ्या शत्रूवर तुटून पडता येते. पण करोनासारख्या न दिसणाऱ्या शत्रूच्या विरोधात हे शस्त्र चालत नाही. तरीही आपल्या पोलिसांनी या लढाईचं आव्हान स्वीकारलं आहे. समाजासाठी, लोकांसाठी ते करोना काळातही कर्तव्य बजावत आहेत.

दरम्यान करोनाचा विषाणू जसे रूप बदलतो आहे, त्याचप्रमाणे गुन्हेगारी रूप बदलत आहे. आता ऑनलाइन गुन्ह्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. बँकिंग क्षेत्रातील ऑनलाइन गुन्ह्यांचा बंदोबस्त आता करावा लागणार आहे. गुन्हे ऑनलाइन होत असले, तरी त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचून त्याला प्रत्यक्ष खऱ्या बेड्या घालव्या लागणार आहेत. त्यामुळे जोश आणि होश यांचे तारतम्य बाळगावे लागेल, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!