Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पत्नीचे शीर धडावेगळे करून निर्घृण खून करणाऱ्या पतीला फाशीची शिक्षा

Spread the love

फरीदाबाद : आधी त्याने पत्नीची कैचीने गळा  कापून हत्या केली आणि नंतर थंड डोक्याने तिचे डोके धडावेगळे करून तिच्या शरीराचे तुकडे करून उड्डाणपुलावर फेकून दिले . हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यातील या  भयंकर घटनेवर न्यायालयाने आरोपीला २० हजार रुपये दंडासह  फाशीची शिक्षा सुनावली आहे. सोबतच आरोपीला वीस हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. आपल्या निकालात न्यायालयाने  म्हटले , आहे कि , आरोपीची  हत्येची पद्धत अत्यंत विचित्र आहे. अशा व्यक्तीचं जिवंत राहाणं समाजासाठीदेखील चांगलं किंवा सुरक्षित नाही.

याप्रकरणी 17 मार्च 2018 रोजी गुरुग्राम येथील रहिवासी बृज शर्मा यांनी सूरजकुंड ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, बृज शर्मा यांची बहिण अंजूचं लग्न 17 वर्षाआधी हरीनगर आश्रम नवी दिल्ली येथील रहिवासी संजीव कौशिकसोबत झालं होतं. संजीव कौशिक दिल्‍ली नगर निगममध्ये नोकरी करत होता. या घटनेच्या काही दिवस आधीच तो ग्रीन फील्ड कॉलनीमध्ये येऊन राहात होता. या दाम्पत्याला एक मुलगाही आहे, याचं वय पंधरा वर्ष आहे. संजीव कौशिक नेहमी आपली पत्नी अंजूच्या चारित्र्यावर संशय घेत असे. याच कारणावरुन अनेकदा त्यानं पत्नीला मारहाणही केली. 17 मार्च 2018 लाही दोघांमध्ये भांडण झालं. यावेळी त्यांचा मुलगा ग्रीन फील्ड कॉलनीमधीलच आपल्या नातेवाईकाच्या घरी गेला होता. याचवेळी रागात संजीवनं आपल्या पत्नीचं शीर धडापासून वेगळं केलं. इतकंच नाही तर कात्रीनं तिच्या डोक्याचेही तुकडे केले.

दरम्यान आरोपीने  महिलेच्या शरीराचे तुकडे एका पिशवीमध्ये भरुन लाजपत नगर फ्लायओव्हरवर टाकले. थोड्यावेळात मुलगा घरी पोहोचला तेव्हा दरवाजाला कुलूप लावलेले  होते . त्याने  आपल्या नातेवाईकाला याबद्दल माहिती दिली. यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले . पोलिसांनी दरवाजा खोलला तेव्हा, आतमध्ये अंजूचा धडावेगळा झालेला मृतदेह त्याठिकाणी होता. यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!