Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#ShareMarket : शेअर्स मधून उत्तम परताव्याचे अमीष दाखवून शेकडो नागरिकांची ४कोटींची फसवणूक

Spread the love

औरंगाबाद – शेअर्समधे गुंतवणूक केल्यास उत्तम परताव्याचे अमीष दाखवून शहरातील शेकडो नागरिकांना १० भामट्यांनी ४ कोटी ४ लाख ६७ हजारांना चुना लावल्याचे गुन्हे जिन्सी आणि सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.

जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात साँफ्टवेअर इंजिनिअर सहित ८ ते १० जणांचा समावेश आहे.त्यांची १कोटी २०लाखांची फसवणूक झाली आहे.
या प्रकरणात कबाडीपुर्‍यात राहणारे मोहम्मद अजहर रहिमोद्दीन कुरेशी (४३) धंदा साँफ्टवेअर इंजिनिअर यांनी २०१९साला पासून जसवंतपुर्‍यातील एन.केमल्टीसर्विसेस या कंपनीत २८ लाख रु. गुंतवले व त्यांच्या सोबतच्या नागरिकांनी ९२ लाख रु.गुंतवलेले आहेत. २०१७ पासून वरील कंपनी जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत काम करते. या कंपनीचे मालक खान अब्दुल कादर इलाही खान व त्यांची भावंडे आणि पत्नी आहेत. गेल्या ४ डिसेंबर २०मधे कुरेशी यांनी पोलिसआयुक्तांकडे तक्रार केली होती. याची कुणकुण आरोपींना लागताच आरोपींनी पोलिस कारवाई होऊ नये म्हणून कोर्टात धाव घेतली. कोर्टाने एन.के. एंटरप्राईजेस ला नोटीस बजाण्याचे आदेश पोलिसांना दिल्यानंतर आर्थिक गुन्हेशाखेने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. तर दुसर्‍या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथील भामट्यांनी प्रोझोन माँल जवळील गाळ्यामधे जे.जी.एम.कमोडिटीज शेअर मार्केट नावाने दुकान थाटले. अक्षय आणि प्रियंका भुजबळ या पतीपत्नीसहित मंगळ आणि योगेश भुजबळ यांनी वरील कमोडिटीज चा धंदा सुरु केला. या कंपनीत जवाहरकाँलनीत राहणारे सुनिल राठोड यांनी ६लाख ३०हजार रु. गुंतवले तर त्यांच्या सोबंत इतर ६६नागरिकांनी अशा सर्वांनी मिळून २ कोटी ८४ लाख ६७ हजार रु.गुंतवले या नागरिकांना उत्तम परताव्या सोबंत थायलंड टूरचेही अमीष भामट्यांनी दाखवल्याचे पोलिस तपासात उघंड झाले आहे.

या प्रकरणी सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून वरील प्रकरणात भुजबळ सोबंत आणखी कोण सामिल असतील हे तपासात उघंड झाल्यावर अटकेची कारवाई होईल. अशी माहिती पोलिसांनी दिली. वरील दोन्ही प्रकरणांचा तपास पोलिसआयुक्त डाँ.निखील गुप्ता यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला आहे.पोलिसनिरीक्षक दादासाहेब शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अमोल सातोदकर आणि पीएसआय दिपक लंके करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!