पोलिसांच्या हातावर तुरी देवून गुन्हेगाराने केले पलायन

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंगाबाद : एका लुटमारीच्या गुन्ह्यात पोलिसांनी काल रात्री अटक केलेल्या आरोपीला कोर्टात नेत असतांना पोलिस वाहनातून उडी घेवून धुम ठोकली. ही घटना बुधवारी दुपारी १२.४० च्या सुमारास मुकुंदवाडी पोलिस ठाण्यासमोर घङली. अमर उर्फ अमऱ्या भाऊसाहेब गायकवाड (वय २२, रा.वैशालीधाबा जाधववाडी) असे पोलिसांच्या हातावर तुरी देवून पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. मुकुंदवाडी पोलिस कर्मचारी दादा काटकर हे आरोपी अमर गायकवाडला पोलिस टू मोबाईल वाहनातून कोर्टात हजर करण्यासाठी नेत होते. काटकर आरोपीच्या हातातील हाथकडी काढून दुसर्‍या हातात घालत असतांना अमर उर्फ अमऱ्या गायकवाडने काटकर यांच्या हाताला झटका देत धूम ठोकली. पळून गेलेला आरोपी सापडल्यानंतर या प्रकरणात निलंबनाची कारवाई होईल असे पोलिसआयुक्त डाँ.निखील गुप्ता यांनी सांगितले.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!