Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to
Spread the love

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाचे घडामोडी.

10.02.2021 : 9 :49 PM | पुणे – नवीन बोगद्याच्या वर कात्रज घाट परिसरात डोंगराला भीषण आग, आगीची व्याप्ती आणखी वाढू शकते, आगीत अनेक झाडे जळून खाक, ही आग सुमारे 5 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरली. ही खासगी जमीन असून कात्रज डोंगरावरील जंगलाचा भाग नाही, असे पुणे वन अधिकारी एन एस पगडे यांनी सांगितले.

10.02.2021 : 8:37 PM | गेल्या दहा महिन्यांत वीजेचे एकही बील न भरणाऱ्या ग्राहकांना बसणार शॉक, पश्चिम महाराष्ट्रातील 14 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार, प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले निर्देश, वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई पुढील तीन आठवड्यात होणार, आवश्यकता असल्यास हफ्ते करुन घ्या मात्र बिलं भरा, महावितरणचे आवाहन

10.02.2021 : 8:52 PM |नाशिक – आदिवासी रोजंदारी कर्मचारी आक्रमक.  आदिवासी आयुक्त कार्यालयात मोर्चा पोहोचला जवळपास 300 महिला, पुरुष आंदोलक कर्मचारी आयुक्त कार्यालय आवारात पोलिसांचा बंदोबस्त आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचा चर्चेचा आग्रह

10.02.2021 : 7:37 PM | डॉन अरुण गवळीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या तो नागपूर कारागृहात कैद आहे. त्याच्या शिवाय आणखी 4 कैद्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सर्वांना स्वतंत्र सेलमध्ये एक एकटे ठेऊन उपचार सुरू आहेत.

#MahanayakOnline #CurrentNewsUpdate

#Live | Loksabha | PM Narendra Modi

Like| Share| Subscribe

10.02.2021 : 5:47 PM | ‘आंदोलनजीवी’ आणि ‘आंदोलनकारी’ यांच्यातला फरक समजून घेणे देशासाठी महत्वाचे आहेः पंतप्रधान

10.02.2021 : 5:47 PM | आम्ही सभागृहातून बाहेर पडलो कारण पंतप्रधानांनी शेतकर्‍यांच्या मृत्यूबद्दल, आमच्या चिंतांबद्दल चर्चा केली नाही. त्यांनी मान्य केले की शेतकरी कायद्यात दुरुस्ती आवश्यक आहेत, त्याचा काही राज्यांना फायदा होईल आणि काहींना होणार नाही.  जो कायदा सर्वांनाच लाभदायक ठरणार नाही त्यांना असा कायदा का आणायचा आहे? :  कॉंग्रेसचे अधीर चौधरी

10.02.2021 : 5:41  PM | 21 व्या शतकामध्ये 18 व्या शतकाच्या विचारांसह कृषी क्षेत्राच्या आव्हानांचा सामना करू शकत नाही. आम्हाला ते बदलावे लागेल.शेतकरी गरिबीच्या चक्रात अडकून राहावं ,किंवा जगण्याचे अधिकार त्यांना मिळू नाही असे कोणालाही वाटत नाही. माझा विश्वास आहे की त्याने इतरांवर अवलंबून राहू नये. ही आपली  जबाबदारी आहेः पंतप्रधान

10.02.2021 : 5:36 PM | पंतप्रधानांच्या भाषणा सुरू असतांना टीएमसीचे खासदार सभागृहातून बाहेर गेले.

10.02.2021 : 5:23 PM | कॉंग्रेस पक्ष विभागलेला आणि संभ्रमित आहे. ना तो स्वतःच्या भल्यासाठी कार्य करू शकत नाही ना देशातील प्रश्न सोडवण्याचा विचार करू शकतो. यापेक्षा दुर्दैवी आणखी काय असू शकते ?: पंतप्रधान नरेंद्र मोदी

10.02.2021 : 5:15 PM | युक्तिवाद होणारच – आम्ही विचारलं नाही मग तुम्ही हे का प्रदान केले? स्वीकारणे / नाकारणे हे आपल्यावर अवलंबून आहे. हे अनिवार्य नाही. हुंड्याविरूद्ध कायद्याची मागणी कोणीही केली नव्हती, तरीही ती देशाच्या प्रगतीसाठी बनविली गेली. तसेच प्रगतीसाठी तिहेरी तलाक आणि बालविवाहाविरूद्ध कायदे करण्यात आले: पंतप्रधान

10.02.2021 : 5:08 PM | पंतप्रधानांच्या भाषणा सुरू असतांना कॉंग्रेसचे खासदार सभागृहातून बाहेर गेले.

10.02.2021 : 4:53 PM | माझ्या भाषणांमध्ये अडथळे निर्माण करणे हे एक सुनियोजित षडयंत्र आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

10.02.2021 : 4:53 PM | काँग्रेसवाल्यांनी कृषी कायद्याच्या कलरपेक्षा कन्टेन्टवर चर्चा करणे जास्त गरजेचे होते : पंतप्रधान नरेंद्र मोदी

10.02.2021 : 4:52  PM | राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर मोशन ऑफ थँक्सला दिलेल्या उत्तरात पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी कायद्यांवर भाष्य करीत असताना विरोधी पक्षातील खासदारांनी लोकसभेत गोंधळ घातला.

10.02.2021 : 4:40 PM | ही तर देवाचीच कृपा की आपला देश सुरक्षित राहिला; कारण देवाच्या रुपात डॉक्टर, सुरक्षादूत धावून आले : पंतप्रधान नरेंद्र मोदी

10.02.2021 : 4:40 PM | कोरोनाचा कालखंड हा भारतासाठी टर्निंग पॉईंट, कोरोना काळात देशाने स्वत:ला तर सावरलंच पण इतर देशांनाही मदत केली : पंतप्रधान नरेंद्र मोदी

10.02.2021 : 4:28 PM | भारत हे एकसंघ राष्ट्र होणार नाही, हा समज भारतवासियांनी मोडून काढला : पंतप्रधान नरेंद्र मोदी

10.02.2021 : 4:40 PM |कोरोनाचा कालखंड हा भारतासाठी टर्निंग पॉईंट, कोरोना काळात देशाने स्वत:ला तर सावरलंच पण इतर देशांनाही मदत केली : पंतप्रधान नरेंद्र मोदी

10.02.2021 : 4:28 | देशभक्तीला प्रोत्साहन देणाऱ्या भाषणासाठी देशवासियांच्या वतीने राष्ट्रपतींचे आभार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

10.02.2021 : 4:28 PM |राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी

#Live | RajyaSabhaUpdate
Like | Share | Subscribe

10.02.2021 : 02.50 PM |  ‘भारतरत्न’ हा पक्षाचा नाही, व्यक्तीचा सन्मान असतो ; तुम्ही भारताचा सन्मान आहात, भारतरत्नांनी कोणत्याही राजकीय वादापासून लांब राहानवे – भाई जगताप

10.02.2021 : 02.21 PM | उत्तर महाराष्ट्रातील रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी आक्रमक झाले आहे. रोजंदारी कर्मचारी संघर्ष संघटनेने विविध मागण्यांसाठी पदयात्रा काढली होती व ते आदिवासी विकासभवनवर धडकणार होते. मात्र, ती पदयात्रा नाशिक पोलिसांनी वेशीवरच रोखली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरच कर्मचाऱ्यांचा ‘ठिय्या’.

10.02.2021 : 01.08  PM | पुण्यात येरवडा गुंडाचा बर्थडे म्हणून जेलबाहेर फटाके फोडले. हत्येतील आरोपीच्या वाढदिवशी या आतषबाजी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांने या प्रकरणात दोघांना अटक केली असून 4 जण फरार झाले आहेत.

10.02.2021 : 12.48 PM | नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत संपन्न झाली असून, कोरोनाकाळात राज्याचे उत्पन्न घटले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

निधीवाटपाचे ठरलेले सूत्र. ‘सर्व विभागांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न’.

नंदुरबार जिल्ह्याला 130 कोटी, जळगाव जिल्ह्याला 400 कोटी, धुळे जिल्ह्याला 210 कोटी, नाशिक जिल्ह्याला 470 कोटी, ही नीधी जिल्हा नियोजन फंडातून देण्यात आली आहे. ‘राज्यात,

जिल्ह्याजिल्ह्यात चॅलेंज फंड स्पर्धा. विजेत्या जिल्ह्याला 50 कोटी अतिरिक्त निधी. विभागीय आयुक्त देखरेख करणार असल्याचेही आजीत पवार यांनी सांगितले.

‘साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारचे 50 लाख’

‘1 लाख 50 हजार कोटी वेतन, पेन्शनवर खर्च’

दरम्यान,परिस्थितीचा अंदाज घेऊन लोकलच्या वेळा बदलणार असल्याचे ही ते म्हणाले’

10.02.2021 : 11.34 AM | 26 जानेवारी दिल्ली हिंसाचार प्रकरणातील आरोपी इक्बालसिंगला स्पेशल सेलने पंजाबच्या होशियारपूर येथून काल रात्री अटक केली.

10.02.2021 : 11.48 AM |  वर्सोवाच्या यारी रोड परिसरातील सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत सध्या आग आटोक्यात आली असून कुलिंगचे काम सुरु आहे.

या आगीत चार जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी स्थानिकांनी हे सर्व अनधिकृतपणे सुरू असल्याचा आरोप केला आहे. घटनास्थळी स्थानिक आमदार भारती लव्हेकर पाहणीसाठी आल्या आहेत. या ठिकाणी जर अनधिकृत असे काही असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. माझ्याकडे अशा प्रकारे काही तक्रार आली नव्हती, मात्र ज्या आधी अधिकाऱ्याकडे आली होती आणि त्यांनी कारवाई केली नाही त्यांची चौकशी व्हावी असे आमदार लव्हेकर म्हणाल्या.

10.02.2021 : 10.04 AM |  उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमध्ये दाखल, जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारूप आराखडा आढावा बैठकीसाठी उपस्थित, उत्तर महाराष्ट्रचा आढावा घेणार आहे. नाशिक जिल्हा आढावा बैठकीला सुरुवात झाली असून, पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार आणि इतर अधिकारी उपस्थित आहेत, यानंतर जळगांव, धुळे, नंदुरबारची बैठक होणार आहे.   उत्तर महाराष्ट्रचे सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!