AurangabadCrimeUpdate : रेकाॅर्डवरची महिलांची टोळी पकडली, २ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त, ९जणांना बेड्या

Spread the love

१७ लाखांचा मुद्देमाल केला होता लंपास

औरंगाबाद – गेल्या जून मधे क्रांतीचौक परिसरातील हाॅटेल अमरप्रितच्या आवारातून एलइडी टि.व्ही. प्लंबींग चे सामान जनरैटर बॅटरी, एसी चे पार्ट असे एकूण १६लाख ९८हजारांचा मुद्देमाल सहा महिला चोरांच्या टोळक्यांनी लंपास करुन चोरीचा ऐवज खरेदी करणार्‍या रेकाॅर्डवरच्या गुन्हैगाराला विकला.या प्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी सहा महिला व ३ पुरुषांना अटक केली आहे. या प्रकरणी ११सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे होता.

हाॅटेल अमरप्रितमधून गेल्या जून ते आॅगस्ट दरम्यान वरील मुद्देमाल लंपास झाला होता. या प्रकरणी खबर्‍याने एपीआय राहूल सूर्यतळ यांना अमरप्रित हाॅटेलमधील चोरी प्रकरणात रेकाॅर्डवरील महिला चोरट्यांचा हात असल्षाची माहिती दिली. महिला चोरांची टोळी सदस्य मनिषा राजू लांडगे(४०) रा.राजीवनगर हिला एपीआय सूर्यतळ यांनी चौकशीसाठी आज सकाळी ताब्यात घेतले असता मनिषा लांडगे ने गुन्ह्याची कबुली दिली.या प्रकरणात अट्टल चोरट्या सुरैखा उर्फ भुरी अशोक मगरे(२२)रा.उस्मानपुरा, कपी उर्फ कल्पना लक्ष्मण हिवाळे (२४) रा.नागसेनवन, इंदू हिरामण ढवळे(२५) मिलिंदनगर यांनी चोरीचा प्लान तयार केला होता. तर शालिनी पिसुळै(२४), शिला भिमा सुतार(२०) दोघीही रा.छोटा मुरलीधरनगर यांनी चोरी करण्यात महत्वाची भूमीका बजावली होती. हा सर्व मुद्देमाल रेकाॅर्डवरील वरील गुन्हैगार इम्रानखान इब्राहिमखान रा. जहागिरदार काॅलनी यास विकला. अशी कबुली महिला चोरांनी दिली.दरम्यान इम्रानखान ने छावणीतील मिर्झामुजीब आणि कैसर काॅलनीतील असद करीम यांना विकला होता. जप्त केलेला मुद्देमाल असद करीम ने काढून दिला होता. वरील कारवाई पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहूल सूर्यतळ पोलिस कर्मचारी सय्यद सलीम, मनोज चव्हाण, संतोष रैड्डी,महिला पोलिस ज्योती किर्तीकर, सोनाली वडनेरे यांनी पार पाडली

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.