Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : राष्ट्रपती भवनाजवळ फिरत होती नग्न महिला आणि लोक तिचे फोटो आणि व्हिडीओ घेण्यात मग्न होते….

Spread the love

नवी दिल्लीतील हाय सेक्युरिटी झोन असलेल्या राष्ट्रपती भवन परिसरात  एक महिला नग्नावस्थेत फिरत असताना अनेक बघे या महिलेचे मोबाईल फोटो घेताना आढळून आले. दरम्यान या भागात चित्रीकरणासाठी कार्यरत असलेल्या माध्यम क्षेत्रातील पत्रकारांनी या घटनेची माहिती मिळताच दिल्ली महिला आयोगाला दिल्यानंतर आयोगाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून “त्या” महिलेला कपडे घातले. आणि नंतर या महिलेला संसदभवन रोड पोलिस ठाण्यात नेले. तपासात ही महिला मनोरुग्ण असल्याचे स्पष्ट झाले तिच्याकडे असलेल्या बॅगमध्ये तिचे आधारकार्ड होते. त्यावरून ती कंझावल परिसरातील रहिवाशी असल्याचे निदर्शनास आले.

शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास हि घटना घडली. या महिलेचे वय सुमारे ३५ वर्षे आहे. ती राष्ट्रपती भवन परिसरात फिरत असताना आजूबाजूला लोकांची गर्दी जमली. दरम्यान जमलेलय लोकांनी तिला माणुसकी दाखवीत मदत करण्यापेक्षा आपल्या मोबाइल फोनद्वारे या महिलेचे फोटो आणि व्हिडिओ तयार करताना दिसले. लोक फोटो काढत असल्याचे पाहून देखील ती  महिला आपले शरीर झाकण्याचा कोणताही प्रयत्न करत नव्हती. दरम्यान मीडियाच्या प्रतिनिधीने या घटनेची माहिती फोनद्वारे दिल्ली महिला आयोगाच्या जनसंपर्क अधिकारी आणि ओएसडी राहुल तहिलयानी यांना दिली. ही महिला असहाय्य असून आसपास असलेले लोक तिचे आक्षपार्ह नग्न फोटो खेचत असल्याची माहिती या प्रतिनिधीने महिला आयोगाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना दिली. दरम्यान राहुल तहिलयानी यांनी तत्काळ ही माहिती दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना दिली.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या सूचनेनुसार, घटनास्थळी तत्काळ एक पथक पाठवण्यात आले. या पथकाने या महिलेला कपडे दिले. या महिलेजवळ एक शाळेची बॅग होती. तसेच काही पुस्तके आणि आधारकार्ड होते. आधारकार्डावरील पत्त्यानुसार ही महिला कंझावल येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. महिलेची मानसिक स्थिती चांगली नसल्याने ती विशेष अशी माहिती देऊ शकली नाही. महिलेने दिलेल्या जुजबी माहितीनुसार, तिला दोन मुले आहेत. त्यानंतर महिला आयोगाचे पथक महिलेच्या घरी गेले. मात्र तिची मुले तिच्या जावेकडे असतात असे स्पष्ट झाले. या महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर तिचे मानसिंक संतुलन बिघडले आणि त्यानंतर ती घर सोडून निघून गेली. त्यानंतर महिलेच्या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी तिच्या मोठ्या जावेने घेतली आहे. या महिलेला आता रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याचे दिल्ली महिला आयोगाने सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!